Breaking News

गायींना लसीकरण करून घेण्याचे देशमुख यांचे आवाहन

अहमदनगर, दि. 18, ऑक्टोबर  - संगमनेर तालुक्यात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे व जिल्ह्यात सर्वात चांगल्या पद्धतीने आपल्याकडे हा व्यवसाय चालतो. दुग्ध  व्यवसायातील गायींच्या आरोग्यावरील खर्च कमी करण्यासाठी राजहंस दूध संघाच्या माध्यमातून स्वयंरोजगार केंद्राधिकार्यांमार्फत मागील वर्षी 15 हजार गायींना अनुदानित तत्वावर  लसीकरण करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर दूधउत्पादकांनी गायींना लसीकरण करून घेण्याचे आवाहन राजहंस दूध संघाचे अध्यक्ष चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केले.
आनंदवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या वसू बारस कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजहंस दूध संघाचे ज्येष्ठ संचालक बाजीराव पाटील खेमनर होते. तर  संघाचे उपाध्यक्ष साहेबराव गडाख, जि.प. समिती सभापती अजय ङ्गटांगरे, मिलिंद कानवडे, संचालक विलासराव कवडे, विलास वर्पे, मोहन करंजकर, अण्णा राहिंज, संतोष मांडेकर,  तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. दिघे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.थिटमे, डॉ.वाकचौरे, दूध संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.एकशिंगे उपस्थित होते.
पुढे बोलतांना देशमुख म्हणाले की, आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर दूध संघाद्वारे दूध उत्पादकांच्या उन्नतीसाठी सातत्याने अभिनव उपक्रम राबविले जातात.  दूध संघाच्या माध्यमातून जंतनिर्मुलन व लसीकरण केल्यापासून कावीळ व खुरकुत या आजारांवरील औषधांची विक्री कमी झाली आहे. मेडिकल दुकानांच्या घेतलेल्या आभ्यासपूर्ण  माहितीनुसार संगमनेर शहरामध्ये 80 लाख रुपयांची विक्री कमी झाली आहे.
राजहंस दूध संघाने यावर्षी 1. रुपया 70 पैसे प्रतिलिटरप्रमाणे रिबेट दिल्याने संगमनेर तालुक्यात दिवाळी आनंदात साजरी होणार असल्याचे ते बोलले. कार्यक्रमाचे प्रास्तविक कै लासराव सरोदे यांनी केले. सूत्रसंचालन संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पी.बी. पावसे यांनी केले. यावेळी आनंदवाडी येथील ग्रामस्थ व तालुक्यातील दूध उत्पादक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.