Breaking News

एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल

अहमदनगर, दि. 18, ऑक्टोबर  - ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यात सर्वत्र एस. टी. कर्मचार्‍यांनी बंद पुकारला आहे. मागील वर्षी दिवाळीच्या काळात श्रीगोंदा डेपोला चांगलेच उत्पन्न  मिळाले होते. मात्र या वेळी  संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. 
श्रीगोंद्यातील महाराष्ट्र एस टी कामगार संघटना या संपामध्ये सहभागी झाली असून, यामध्ये अनेक मागण्या कर्मचार्‍यांनी सरकार पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  या संपा मधील  एस टी कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍याप्रमाणे सेवाजेष्ठते नुसार पदनिहाय वेतन श्रेणी व सातवा वेतन आयोग लागु करावा, दि. 1 जूलै 2016 पासून देय होणारा सात टक्के वाढीव  महगाई भत्ता तसेच जानेवारी 2017 पासून 4 टक्के वाढीव महगाई भत्ता थकबाकीसह लागू करावा, कनिष्ट वेतन श्रेणी रद्ध करावी, 1 एप्रिल 2016 पासून हंगामी वाढ लागू करावी,  सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीस रु 500 चा मोफत पास देण्यात यावा, अशा अनेक मागण्या घेऊन कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.
या संपामध्ये महाराष्ट्र एस टी कामगार संघटना,महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन,विदर्भ एस टी कामगार संघटना, महाराष्ट्र एस टी वर्कर्स कोंग्रेस ,कनिष्ट वेतनश्रेणी कामगार संघटना  यांनी देखील सहभाग नोदवला आहे.