Breaking News

पाथर्डीमध्ये एस. टी. कामगारांचा बेमुदत संप

अहमदनगर, दि. 18, ऑक्टोबर  - महाराष्ट्र राज्य एस टी कामगार संघटनेच्या वतीन एस टी कामगारांच्या विविध मागण्या मंजूर कराव्या यासाठी 17 ऑक्टोबर पासून बेमुदत संप  पुकारला गेला असून या संपाला पाठींबा नोंदवत आज पाथर्डी आगराने आपला सहभाग नोंदवत.पाथर्डी आगराच्या वतीने मंगळवारी एक पण बस सोडण्यात आली नाही.तर नवीन बस  स्टँड येथे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.
एस.टी. कामगाराचे वेतन शासकीय कर्मचार्‍याप्रमाणे व्हावे यासाठी सेवाजेष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेण्यासह सातवा वेतन आयोग लागू करावा.1जुलै 2016 पासून वैध होणार सात  टक्के वाढीव भत्ता तसेच जानेवारी 2017 पासूनचा 4% भत्ता थकबाकीसह त्वरित लागू करावा.कनिष्ठ वेतन श्रेणी रद्द करावी.जुल्मी परिपत्रके, खाजगी गाड्या भाड्याने घेण्याचा निर्णय  चालक कम वाहकाची संकल्पना बंद करावी.करार, कायदा, परिपत्रके यांचा भंग करून होणार्‍या यांचा आवश्यपूर्वक बदल्या व कारवाया त्वरित थांबाव्या.सेवानिवृत्त कर्मचारी आणि  त्यांच्या पत्नीस पतीस पाचशे रूपायाचा मोफत पास दयावा अश्या विविध मागण्यासाठी एस टी कामगाराच्या वतीने संप पुकारला आहे.
ऐन दिवाळीच्या सुट्टीत हा संप पुकारल्यामुळे मोठ्या प्रमाणात शासनाचे नुकसान झाले आहे तर या संपामुळे सुट्टी असल्याने आपल्या गावी जाण्यार्‍या प्रवासाचे मात्र हाल होताना  पाहवयास मिळत आहे..तर दुसरीकडे खाजगी गाड्याना या संपाचा फायदा झाला आहे.तर पाथर्डी येथील दोन्ही बस स्टँडवर शुकशुकाट पाहला मिळत आहे
यावेळी डी. जी. अकोलकर, बाळासाहेब सोनटक्के, अंबादास शिरसाठ, जहीर शेख, इलियास शेख, संभा आव्हाड व सर्व कर्मचारी उपस्थित होते.