Breaking News

एकनिष्ठा फाऊंडेशनच्या वतीने दिवाळीनिमित्त मिठाई वाटप

बुलडाणा, दि. 27, ऑक्टोबर - एकनिष्ठा फाऊंडेशनच्या वतीने दिवाळीनिमित्त 19 ते 24 ऑक्टोंबर दरम्यानर रुग्णांना रक्त, गरिबांना आर्थिक मदत तसेच मिठाईचे वाटप करुन  दिवाळी साजरी करण्यात आली. स्थानिक सामान्य रुग्णालयात टेंभूर्णा येथील गणेश हरिभाऊ गायकवाड या रुग्णाच्या शरीरात भरती करते वेळेस फक्त 3 टक्केच हिमोग्लोबीन होते. 
सदर रुग्ण मरणावस्थेत दवाखान्यात भरती झाला होता. त्याच्याकडे एक रुपयाती नव्हता. अशा अवस्थेत एकनिष्ठा फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरज यादव यांनी त्वरीत दवाखान्यात जावून  त्या रुग्णाला 3 बॉटल रक्त पुरवठा करुन 1500 रुपयाची मदत करुन वाचविले. तर धम्मदीप शांताराम धुरंधर रा.ढोरपगाव या रुग्णास दोन बॉटल रक्त देवून त्याचे प्राण वाचविले व  आवश्यक औषधोपचाराच खर्च दिला.  मंगेश भिमराव तायडे रा.संग्रामपूर व पाडुरंग फकीरचंद टिकार यांना औषधोपचरासाठी आर्थिक मदत करुन रक्ताच पुरवठा करण्यात आला.
घारोड येथील यशोदा खंडूजी गवई या महिलेस दोन बॉटल रक्त देवून तिचेवर उपचार करण्यात आले. अशा प्रकारे एकनिष्ठा फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी दवाखान्यात जावून रक्त  पुरवठा व आर्थिक मदत करुन आपली दिवाळी साजरी केली.
याप्रसंगी फाऊंडेशनचे सुरज यादव, राम अवचार, विरेंद्र दिपके, अक्षय राऊत, अक्षय खंडेलवल, ज्ञानेश सेवक, श्याम सपकाळ, डॉ.निशान मुखिया, सुरज गावंडे, विक्की सारवान,  चंद्रकांत पाटील, कैलस दणके, शंकर पाथरकर, सिद्धार्थ कळसकर, मोहन लोळे, अजय ताठे, अक्षय साळवे, प्रशांत देशमुख बंटी चव्हाण, किशार भोपळे, अजय सेवक, अनिल  गवई, सौ.मंदा गवई, रविराज भातुरकर, निलेश वाघमारे, डॉ.टापरे, डॉ.गोरे, डॉ.छाजेड, डॉ.मुंडे, सौ.पाटील, सौ.झाडे, डॉ.सरोदे, डॉ.मुळे, डॉ.कलंत्री, डॉ.नाईक आदींनी विशेष परिश्रम  घेतले.