Breaking News

देसवडे पुलाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

अहमदनगर, दि. 27, ऑक्टोबर - नेवासा तालुक्यातील अडगळीत असलेल्या तेलकुडगाव व देवसडे गावाला येण्यासाठी रस्ताच नसल्याने गावातील नागरिकांना गाव आदिवासी  असल्याचे भासू लागले आहे.   पावसळ्यात सर्वत्र पाउस चांगला झाल्याने या गावाला जाणार्‍या  रस्त्यावर देवसडे  गावाच्या लगत असलेल्या नदीवर पावसाच्या पाण्याने या नदीला मोठे भगदाड पडले. त्यामुळे  जड  वाहतुकीला मोठा अडथला निर्माण झाला.  आता काही दिवसावर उस कारखाने चालू होणार आहेत. तेलकुडगाव परिसर हा उसाचे आगर  म्हणून ओळखला जातो या परिसरा तील   उस नेण्यासाठी अनेक कारखाने डोळा ठेऊन असतात   या परिसरातून  शेतकर्‍यांचा उस कारखान्यांना जाणार आहे मात्र देवसडे पुलावरील नदीच्या भगदाडाने या उस वाहतुकीला  मोठा अडथला निर्माण होणार असून त्यामुळे मात्र या दोन गावाच्या व परिसराच्या नागरिकांना (शेतकर्‍यांना) आता चिंता वाटू लागली आहे.  एकीकडे पावसाने व वार्‍याने  उस  भुईसपाट झाला तर पावसाच्या अगोदर कमी पाण्याने उन्नी  कीड लागून उसाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे आडसाली उस आता लवकर जाण्याची शेतकर्यांना अपेक्षा असताना  प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं  हा पूल लवकर होणार नसल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत  शेतकर्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हलगर्जीपणामुळे  मोठ्या नुकसानाला सामोरे जावे  लागणार आहे. या रस्त्यासाठी अनेक वेळा शेतकरी नागरिकांनी आंदोलने देखील केली आहेत मात्र त्यांना फक्त आश्‍वासनवरच बोळवण झाली.  या रस्त्याकडे आजी-माजी लोकप्रति निधी नी  जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा  आरोप आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी  योग्य राहिला नसल्याने रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता? हेच कळत नाही रस्त्याच्या  दुतर्फा वेड्याबाभळी वाढल्याने एकावेळी एकच वाहन रस्त्यावर बसते त्यामुळे या रस्त्यावर रोज एकतरी अपघात झाल्याशिवाय राहत नाही. या रस्त्यावरून दररोज हजारो टन उस  वाहतूक कशी होणार ? हाच प्रश्‍न सध्या या परिसरात उपस्थित होत आहे. या पुलाची उंची वाढून हा पूल नवीन करून दोन्ही बाजूने कठडे तयार करून एकावेळी दोन वाहने एकमेक ांना पास झाली पाहिजे असा उत्तम दर्जाचा पूल या ठिकाणी लवकर तयार करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.