Breaking News

नांदेड रेल्वेस्टेशनवर पर्यायी पादचारी पूल बांधा - अशोक चव्हाण

नांदेड, दि. 02, ऑस्टोबर - मुंबईच्या घटनेची नांदेडात पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नांदेड रेल्वेस्थानकावर पर्यायी पादचारी पूल उभारावा अशी मागणी माजी  मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केली़ या बाबत काही सूचनाही चव्हाण यांनी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना केल्या़ आहेत.नुकतेच मुंंबई येथे पुलावर  चेंगराचेंगरी होवून लोक मरण पावले. या पार्श्‍वभुमिवर त्यांनी ही मागणी केली. मराठवाड्यात नांदेड हे महत्वाचे रेल्वेस्टेशन असून नांदेडला येणा-या भाविक आणि  नागरिकांची संख्या मोठी असते़ एकाच वेळी या स्टेशनवर 70 हून अधिक रेल्वे नांदेड स्टेशनवरुन ये-जा करतात़ त्या मुळे गर्दी खुप असते. सध्या रेल्वेस्टेशनवरील  दोन्ही सरकते जिने बंद आहेत़, असे ते म्हणाले.