Breaking News

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

हिंगोली, दि. 02, ऑस्टोबर - तलावात पोहण्यासाठी गेलेल्या अर्जून विलास शिंदे , वय 18 या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. औंढा नागनाथ येथील  वासुदेवगल्ली येथील रहिवासी आहे. शहरातील हरिहर तलावात दुर्गादेवीचे विसर्जनाचा कार्यक्रम सुरू होता.त्या काळात अर्जून शिंदे हा मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी  गेला होता. मात्र तो पाण्यात बुडाला. इतर युवकांनी त्याचा पाण्यात शोध घेतला. मात्र तो सापडला नाही नंतर त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगत असलेला अढळून  आला.तो औंढा नागनाथ येथील वासुदेवगल्ली येथील रहिवासी होता.