महादेव शेलार यांच्या निधनाने दिलदार प्रतिस्पर्धी गमावला - माधव भांडारी
मुंबई, दि. 15, ऑक्टोबर - काँग्रेस प्रवक्ते ड. महादेव शेलार यांच्या निधनाने आपण एक दिलदार प्रतिस्पर्धी गमावला असून मराठी वृत्तवाहिन्यांवरील राजकीय चर्चांमध्ये त्यांची उणीव सदैव भासत राहील, अशी श्रद्धांजली भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी शनिवारी अर्पण केली.
मा. माधव भांडारी म्हणाले की, ड. महादेव शेलार हे काँग्रेसचे प्रवक्ते असल्याने दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील चर्चांमध्ये आपली तसेच भाजपाच्या अन्य प्रवक्त्यांची त्यांच्याशी नेहेमी चकमक उडत असे. आरोप प्रत्यारोपही होत असत. परंतु, ही वादावादी केवळ परस्पर विरोधी राजकीय भूमिकांपुरती मर्यादित राहिली व त्यातून वैयक्तिक कटुता निर्माण झाला नाही. ड. महादेव शेलार हे अभ्यासू प्रवक्ते होते. राजकीय विरोधकांचे मुद्दे ऐकून घेण्याचा दिलदारपणा त्यांनी नेहेमी दाखविला. राजकीय मतभेद असले तरी मनभेद होता कामानयेत, ही महाराष्ट्रातील राजकीय सुसंस्कृतपणाची परंपरा त्यांनी पाळली. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.