शहरात सरीवर सरी, 19.5 मि.मी पावसाची नोंद
पुणे, दि. 15, ऑक्टोबर - शहराच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. शहरातील मध्यवर्ती भागासह डेक्कन परिसर, शिवाजीनगर, विद्यापीठ परिसर, पुणे स्टेशन परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. सायंकाळपर्यंत शहरात 19.5 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
शहरात आज(शनिवारी) 29.6 अंश सेल्सिअस कमाल आणि 21.4 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. दरम्यान, रविवारी (15 ऑक्टोबर) देखील शहराच्या काही भागांत दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. सुमारे अर्धा ते पाऊण तास पाऊस पडल्याने नागरिकांची सलग दुसर्या दिवशी दाणादाण उडवून दिली.