डॉक्टरांवरील वाढते हल्ले हा चिंतेचा विषय - शरद पवार
मुंबई, दि. 16, आक्टोबर - मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात डॉक्टर्स सेलची राज्यव्यापी बैठक पार पडली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी डॉक्टर सेलच्या कामाचे कौतुक केले. डॉ. घुले यांच्या संकल्पनेतून ही वैद्यकीय संघटना सुरू झाली असून त्यांच्या पश्चात त्यांचे सहकारी या सेलचे काम चांगले करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
डॉक्टरांवर होणारे हल्ले हा चिंतेचा विषय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आघाडी सरकार असताना डॉक्टरांना संरक्षण देण्याचा कायदा तयार केला गेला होता मात्र या कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, असे ते म्हणाले. त्या कायद्यात काही कमतरता असल्यास डॉक्टर सेलकडे त्याबाबत सूचना कराव्यात, आपण त्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवू असे आश्वासन त्यांनी दिले.
या सरकारने डॉक्टरांविषयी क्लेशकारक निर्णय घेतले. सामाजिक सेवा पुरवत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतयं असं मत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं. राज्यात नर्सेसची कमतरता आहे. योग्य प्रशिक्षण केंद्र उभारल्यास राज्यातील महिला या क्षेत्रात सेवा देऊ शकेल. आघाडी सरकारच्या काळात डॉक्टरांच्या संरक्षणाचा कायदा आणला गेला होता. मात्र आज सरकार डॉक्टरांना संरक्षण देण्यात कमी पडत आहे. आज संपूर्ण देशच आजारी आहे. देशाला या आजारातून मुक्त करण्यासाठी योग्य विचार करणार्या लोकांनी पुढाकार घ्यायला हवा असे आवाहन त्यांनी केले. देशाला या आजारातून मुक्त करण्यासाठी 2019 साली आपली भूमिका महत्त्वाची ठरेल त्या दृष्टीने प्रयत्न करा असे वक्तव्य त्यांनी केले.