Breaking News

भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त 800 हून अधिक लोकांनी केले अवयवदान

नाशिक, दि. 16, आक्टोबर - माजी उपमुख्यमंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर राबविण्यात  येत असलेल्या अवयवदान मोहिमेस नाशिक शहर व जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नाशिक शहर व जिल्ह्यातून 800 हून अधिक लोकांनी अवयवदान केले असल्याची मा हिती समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी दिली . 
छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर ‘अवयव दानाचा’ संकल्प करण्यात आला असून विविध अभिनव सामाजिक उपक्रमातून यंदाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.  समाजात अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुववर्ष प्रतिक्षेत आहेत. अवयव दान हे केवळ डोळे किंवा किडनी पुरते मर्यादित नसून शरिराचे सुमारे 10 वि विध अवयव आपण दान करू शकतो. याचे प्रबोधन होण्यासाठी आ.छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत राज्यभरात अवयवदानाचा संकल्प करण्यात  आला होता. त्यानुसार नाशिक शहर व जिल्ह्यातील लोकांनी अवयव दान शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.
त्याचबरोबर त्याचबरोबर रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना मदत, अनाथ आश्रम व आदिवासी आश्रमशाळा येथील गरजू विद्यार्थ्यांना साहित्याचे  वाटप, वृद्धाश्रमात व ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध साहित्याचे वाटप, अंध अपंग विद्यार्थ्यांसाठी काम करणार्‍या संस्थाना मदत, रूग्णालयामध्ये फळवाटप, अन्नदान, वस्त्रदान, तसेच ना शिक जिल्हाभरात वृक्षारोपण देखील करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, अंबादास खैरे, धर्मा भामरे, बाळासाहेब बागुल,झगडे, संजय काकड, मोतीराम पिंगळे, दिलीप दोंदे,  शिवा काळे, गोकुळ बत्तासे, सुरेश खोडे, राजाभाऊ शिंदे, विलास बोरस्ते यांनी विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.