Breaking News

साईभक्तांची काळजी घेणार्‍या जम्बोचा वाढदिवस उत्साहात

गुणी श्‍वान ‘जम्बो’वर भाविकांच्या सुरक्षेची भिस्त

अहमदनगर, दि. 23, ऑक्टोबर - साईबाबा संस्थानच्या सुरक्षेसाठी असलेल्या बॉम्बशोधक पथकातील असलेला श्‍वान जम्बो हा 24 तास आपल्या पथकासमावेत सदैव सज्ज असतो  वर्षभरात साईदर्शनासाठी जवळपासयेणार्‍या 2 कोटी भाविकांच्या सुरक्षेसाठी जम्बो व वर्धन सदैव तैनात असतात आपल्या कामगिरीतून ते साईबाबांची एक प्रकारे जशी सेवा करतात  तशी भक्तांची ही करत असतात त्यांच्या पथकात एक अधिकारी दोन चालक व सहा पोलीस कर्मचारी असून नुकताच पाडव्याच्या दिवशी जम्बो वय 7 वर्ष पूर्ण होऊन 8 व्या वर्षात  पदापर्ण केल्याबद्दल त्याचा इतरांप्रमाणे सर्व कर्मचार्‍यांनीआनंदोत्सव साईमंदिर परिसरात साजरा केला व त्यातून श्‍वानाच्या प्रती असलेली निष्ठा व प्रेम किती घट्ट आहे हेच दाखून दिले  या प्रसंगी स.पो.नि.विकास घनवट पोलीस नाईक संदीप पाठक प्रदीप भिंगारदिवेश्यामसुंदर गुजर आदींसह कर्मचारी हजर होते
दोन श्‍वान जम्बो आणि वर्धन हे दोघे नित्यनियमाने साईदर्शन घेऊन संपूर्ण मंदिराची व मंदिर परिसराची तपासणी केली जाते साईभक्त व साईसंस्थान कर्मचारी आत सोडण्या अगोदर  जम्बो तर कधी वर्धन आळीपाळीने अंतर्गत मंदिरात कसून तपासणी करतात तपासणी नंतर जम्बो व वर्धन नित्यनियमाने साईसमाधीला नतमस्तक होऊन बाहेर पडताच मंदिर  साईभक्तांच्या दर्शनासाठी खुले केले जाते यावेळी त्यांची ही रोजची सर्विस अनेक साईभक्त पाहत असतात या दोघांचीविशेष काळजी घेण्यासाठी पाच श्‍वान हस्तक असून पोलीस  नाईक प्रकाश साळवे दिलीप पूरनाळे प्रताप डोळसे व श्यामसुंदर गुजर हे काळजी घेत असतात तर दोघांना साईमंदिर रेल्वेस्टेशन भोजनालय बसस्थानक मेघाधर्मशाळा मेघा आश्रम  या ठिकाणी पोलीस वाहनातून चालक महमद शेख जयसिंह ठोकळ हे घेऊन जात असतात सर्वांच्या एक विचारातून आपला सहकारी जम्बोचा वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना  पुढे आली आणि त्यातून आगळावेगळा हा कार्यक्रम साईबाबांच्या दरबारात गाजावाजा न करता साजरा करण्यात आला त्यातून आपल्या सहकार्याच्या प्रती प्रेम व बांधील की कशी  असते हेच वाढदिवसाच्या प्रसंगी दिसून आले जम्बोला उदंड आयुष्य व अशीच सेवा साईबाबांचीघडत जाओ अशी प्रार्थना करण्यात आली.