Breaking News

बाजारपेठेतील मंदीचा भिकार्‍यांच्या झोळीलाही फटका

अहमदनगर, दि. 23, ऑक्टोबर - पाचशे व हजार नोटा बंदीचा निर्णय मोदी सरकारने घेतला पेसे असून हि अनेकांची अवस्था गरीब सारखी झाली चिल्लरलाही महत्व प्राप्त झाले  प्रतेक जन कमी खर्च व व पैसे वाचवण्याचा प्रयत्न त्याची परिणीती शिर्डी येथील साई नगरीतील भिकार्‍यांना जसा बसला तसा व्यापार्‍यांना हि बसला आहे नोट बंदीमुळे छोटे मोठे  व्यवसाय अडचणीत आले बिन भांडवली धंदा म्हणून ओळखल्याजाणार्‍या भिकार्‍यांना हि ह्या सर्जिकल स्ट्राकईचा फटका बसला दानशुरानाचे हि हात अखडल्यामुळे भिकार्‍यांची झोळी  रिकामीच राहिली त्यामुळे अनेक भिकारी वयोवृद्ध अपंग व अपंगत्वाचा बाजार मांडणारे काही जन साई मंदिरापासून परागंदा झाले तर काहीजण मात्र आज न उद्या परिस्थिती सुधरेल  ह्या आशेवर ठाण मांडून बसले आहे ह्या पूर्वीच्या पोलीस अधिकार्यांनी भक्तांना त्रास देतात ह्या कारणावरून अनेकांची भिक्षेकरी ग्रहात न्यायालयाच्या आदेशने रवानगी केली होती  त्यावेळी हि शिर्डी भिकारी मुक्त झाली होती
साई मंदिर भोजनालय द्वारकामाई पिंपळवाडी रोड मंदिराचे चारही गेट बसस्थानक ह्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भिकारी बसलेले असतात याचे व्यवस्थापन व नियम भिक मागण्याचा  जागा एक महिला ठरवते याची खडानखडा माहिती पोलिसांना हि आहे यातीलच भिक मागणार्‍या महिलेने साई भक्ताचे बाळ चोरून नेले होते मात्र प्रसिद्धी माध्यमाने लक्ष घातल्यानंतर  मातेले बाळ मिळाले होते यातील काही भिकार्‍यांची परिस्थिती चांगली आहे कमी श्रमात पेसे मिळतात म्हणून काहींनी हा व्यवसाय स्वीकारला आहे रात्री बस स्थानकावर झोपणे  मिळालेली चिल्लर व्यापार्‍याला देऊन नोटा घेऊन काहीजण घरी जातात त्यामुळे सुट्टे पैसे सुद्धा साई भक्त व नागरिक जपून वापरत आहे सुट्ट्या पैश्यांची चचन आहे भिकार्‍यांची  झोळी रिकामीच एक ते दोन दिवसात गर्दी वाढतअसल्याने आता समाधानाचे वातावरण पसरले आहे आता वाढणारे भिक्षेकरी पोलिसांच्या रडारवर असून लगतच्या काळात त्यांच्यावर  कारवाई होण्याची शक्यता आहे भक्तांना त्रास देणे वेठीस धरणे अंगाला स्पर्श करणे यामुळे भक्त वर्गात नाराजीची भावना आहे.