Breaking News

डिजिटल मिडियात युवकांना सक्रिय व्हावे : बोरा

अहमदनगर, दि. 23, ऑक्टोबर - सामाजिक प्रश्‍नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने युवकांना डिजिटल मीडियाचा वापर करावा.सोशल मिडिया हे सर्वात गतीमान असल्याने युवकांनी  त्यामध्ये सक्रिय व्हावे, असे प्रतिपादन श्री. आशिष बोरा यांनी केले.
पुणे येथील कॅलिडस कॅडमीमार्फत डिजिटल मीडियावर झालेल्या कार्यशाळेत ते लाईव्ह कार्यक्रमात बोलत होते.राज्यभरातून निवडलेल्या 50 व्यक्तीमध्ये आशिष बोरा यांनी कर्जतचे प्र तिनिधित्व केले. सर्वश्री. महेश हात्रे,  पंकज इंगोले, सुनील ढेपे आदींनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. डिजिटल मिडियाचा प्रभावी वापर करीत तालुक्यात कर्जत तालुका डॉट कॉम  नावाची पहिली वेबसाईट सुरु केली.ते वृत्तपत्र पत्रकारिता, व्हिडिओ जरनॅलिझममध्येही कार्यरत असुन व्हाट्सप, फेसबुक अशा सर्वच सोशल मीडियात सक्रिय आहेत. सोशल मी डियातील प्रयोगशील पत्रकार म्हणून युवकांना सोशल मिडियाचा प्रभावी वापर कसा यावरही ते मार्गदर्शन करणार आहेत. अनेक युवक सोशल मीडियावर अनावश्यक वेळ घालवत  भरकटत जातात.त्यांच्यासाठी कर्जत येथे कार्यशाळा आयोजित केली जाणार असल्याचे बोरा म्हणाले.