नाराजांनी पक्षाच्या व्यासपीठांवर बोलावे; प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची तंबी
नागपूर, दि. 16, ऑक्टोबर - इतर पक्षांमधील विरोधकांना समोर जाण्यासाठी आपण सज्ज आहोत. परंतु, पक्षांतर्गत कुणाची नाराजी असेल तर त्यांनी ती पक्षाच्या व्यासपीठावर मांडली पाहिजे. अगदी आपल्या विरोधातील तक्रारी ऐकून घेण्यासाठी तयार आहे. पण, त्यापूर्वी तुमचे काम दाखवा आणि नंतर बोला आशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पक्षांतर्गत विरोधकांना खडसावले. अशोक चव्हाण यांचे आज, सोमवारी सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले. यानंतर महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश यांच्यासोबत ते यवतमाळसाठी रवाना झाले. तत्पूर्वी पत्रकारांशी त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला.
काही दिवसांपूर्वी विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी चव्हाण यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करीत दिल्लीत त्यांची तक्रार केली होती. याबाबत विचारले असता ते म्हणाले, मी स्वत: गट- तट मानत नाही. आपण प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत पक्ष बळकट करण्यावरच भर देणारअसल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेत नगगरसेवकांची पळवापळवी सुरू झाली आहे. भाजपाने देशभरात सत्तेसाठी पळवापळवीचे उद्योग केले. पक्षांतर बंदी कायदा तर धुडकावून लावला. आता तेच शिवसेना करीत आहे. हे प्रकार लोकशाहीसाठी मारक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी सांगितले की, नागपुरातही नेत्यांचे समीकरण बसविता आले असते तर मला अधिक आनंद होईल. आपल्याला कुणालाही प्रमोट करायचे नाही किंवा कुणाचीही बाजू घ्यायची नाही. नागपुरात गटबाजीचा इतिहास फार जुना आहे. कोणत्याही प्रदेशाध्यक्षासाठी हे काही नवीन नाही. कुणाची नाराजी असेल तर त्यांनी आपल्याशी चर्चा करावी. आपण चर्चेला सदैव तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे नागपूर विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. या वेळी चव्हाण यांचा जयघोष करण्यात आला.