Breaking News

शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रेरणादिन उत्साहात साजरा

अहमदनगर, दि. 15, ऑक्टोबर - शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी आज शनिवारी देशाचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त सामुहिक वाचनाने  प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील
रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयात सामुहिक वाचनाने वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. देशाचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.  पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडूळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
मुख्यध्यापक शिवाजी लंके यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी शाळेत राबविण्यात येणार्या उपक्रमाची माहिती दिली. प्राचार्य अरविंद काकडे यांनी  वाचनाचे महत्त्व विशद केले. ज्ञानदेव पांडूळे म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत आहे. वाचनाने मन व बुध्दी प्रगल्भ होते. तर नवीन विचारांना चालना मिळते.  विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजल्यास सुजान नागरिक घडणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपशिक्षिका उर्मिला साळुंके, मिनाक्षी खोडदे, माणिक दळवी, नंदा  दानवे आदिंसह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बालभवन प्रकल्प
शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य शासन विभागाच्या उपक्रमानुसार, स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पाद्वारे भारत रत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या 15 ऑक्टोबर जयंती निमित्त  अहमदनगर शहरातील 7 सेवावस्त्यातील उत्कर्ष, क्षितीज व परीस, डॉ. अब्दुल कलाम, डॉ.एस.के.हळबे, मलाला, उर्जा बलभवनात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.  मुलांना वाचनाची गोडी निर्माण करणे, बालभवनात वाचन संस्कृती निर्मण करणे हा उद्देश समोर ठेऊन या दिवशी बालभवनात विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरवून बालकांना मौन व प्रक ट वाचन कसे करावे या विषयी माहिती देण्यात आली. बालभवनातील बालकलाकारानी प्रेरणात्मक व काल्पनिक कवितांचे सादरीकरण केले. बालवाचन मेळावा भरवून मुलांशी वि विध पुस्तकांवर चर्चासत्र, परिसंवाद साधण्याचा प्रयत्न केला. वाचन मेळाव्यामध्ये विविध बालभवनातील 700 बालकांनी मोठया उत्सहाने सहभाग नोंदविला.
वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून प्रा.मुन्ना खान या लेखिकेचे वाड्मय संदर्भात मुलाखतीचे आयोजन केले होते. रेडिओ नगर 90.4 एफ एम च्या आर.जे  चित्रा हिने मुलाखतीद्वारे डॉ.ए.पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्रावर प्रश्‍नोत्तोराच्या माध्यमातून चांगल्या विचारांचे अनुभव कथन केले.
तसेच विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी संयुक्त रित्या दररोज एक तास वाचनास देण्याचा संकल्प सोडला.