Breaking News

सातवा वेतन लागू करण्यासाठी एसटी कामगारांचा बेमुदत संप

गाड्या ठप्प : ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल, 2200 कर्मचारी संपात सहभागी 

बुलडाणा, दि. 18, ऑक्टोबर  - राज्य शासनाने सरकारी कर्मचार्‍यांना सातवा वेतन लागू केला आहे मात्र एसटी महामंडळाने सातवा वेतन लागू केला नाही त्यामुळे रात्री पासून  राज्यातील सर्व एसटी कामगार संघटनानी बेमुदत संप पुकारला असून राज्यातील एसटी सेवा ठप्प झाली आहे, त्याचा परिणाम ऐन दिवाळी सण सुरु असताना प्रवाशांचे बेहाल  होताना दिसत आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील  एसटीच्या सर्व कामगार संघटना या संपात सहभागी झाल्या असल्याने जिल्ह्यातील सर्व बस स्थानके ओसाड़ दिसून आले आहेत, प्रवासी बस स्थानकावर  एसटी येण्याची वाट पाहत आहेत मात्र सकाळ पासून एकहि एसटी बस स्थानकावर आली नाही . सातवा वेतन लागू करावा ही मागणी कित्येक दिवसापासुन संघटनानी शासनाकडे के ली होती मात्र अद्याप पर्यन्त मागणी मंजूर न झाल्याने एसटी कामगार चालक वाहक संपावर गेले आहेत.
बुलडाणा बस स्थानकातील सर्व बसेस डेपो मध्येउभ्या आहेत कर्मचारी पेंडाल टाकून ठिय्या आंदोलन करीत आहे दुसरीकडे प्रवासी त्रस्त आहेत असे एकंदरीत चित्र दिसून आले  आहे. राज्याच्या परिवहन मंत्री दिवाकर रावते यानी या मागनिकडे दुर्लक्ष केल्याने कामगार संघटनेच्या कर्मचार्याणि रावते यांच्या विरोधात घोषणाबाजी केली व जो पर्यन्त सातवा वेतन  लागू होत नाही तोपर्यंत संप मागे घेतल्या जाणार नसल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या संपात महाराष्ट्र इंटक एसटी कामगार संघटनेने सहभाग नोंदवून इंटक राज्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे, माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, चित्रांगण खंडारे व असंख्य एसटी  कामगार उपस्थित होते.
या संपकरी आंदोलनाला बुलडाणा विधानसभेचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट देवून आंदोलनाला पाठिंबा देवून एसटी कामगारांचे प्रचंड हाल होत असून या कामगारांना पुरेसा  पगार वाढविण्यात यावा, यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.