Breaking News

एस.टी.कर्मचार्‍यांच्या संप काळात खाजगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस परवानगी

बुलडाणा, दि. 18, ऑक्टोबर  - महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या संघटनांनी विविध मागण्याकरिता दि. 16 ऑक्टोंबर 2017 रोजीच्या मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. या काळात  नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता संप कालावधीत प्रवाससी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना म्हणून राज्यातील सर्व खाजगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कं पन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दि. 16 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते एस.टी. क र्मचारी संप, आंदोलन मागे घेईपर्यंत ही परवानगी राहणार असल्याचे वाशिम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे. यामुळे खाजगी वाहतूकदारांची कमाई  ऐन दिवाळीमध्ये दुपटीने वाढली असून खाजगी वाहनधारक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळत असून प्रवाशांची प्रचंड आर्थिक लूट करीत असल्याचे चित्र आज सर्वत्र  पाहायला मिळाले. बुलडाणा ते पुणे प्रवासाचे तब्बल दोन हजार रुपये प्रमाणे खाजगी बस मालकांनी आकारल्याची माहिती आहे.