Breaking News

आमदार स्मिताताई वाघ यांची बदनामी; गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगाव, दि. 18, ऑक्टोबर - अमळनेर येथील विधान परिषदेच्या भाजपच्या आमदार स्मिताताई वाघ यांच्या बाबतीत सोशल मीडियावर बदनामीकारक लिखाण करून महिलेचा  अपमान करणार्‍या ओबीसी जनक्रांती परिषदेच्या अनिल महाजन यांचा अमळनेरातील शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी काल रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत त्यांचा प्रतिकात्मक  पुतळा दहन केला, यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी संतप्त भावना व्यक्त करत पुतळ्यास चपलांचा मार दिला व महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी  केली.
ओबीसी जनक्रांती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष असलेले अनिल बी महाजन यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ व स्मिता वाघ यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने एक पत्रक काढले  मात्र या पत्रकात वाघ यांच्या बाबतीत आक्षेपार्य लिखाण केले सदर पत्रकामुळे जिल्ह्यातील असंख्य महिला भगिणींच्या भावना दुखावल्या जाऊन संपूर्ण जिल्ह्यात महाजन यांचा निषेध  व्यक्त करण्यात आला याच अनुषंगाने अमळनेर शहर व ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्त्यांनी काल विश्राम गृह चौकात स्वयंस्पुर्तीने एकत्रीत येऊन महाजन यांच्या निषेधार्थ  जोरदार घोषणाबाजी केली.
महिलांच्या प्रश्‍नासाठी क्रियाशील महिला नेता म्हणून स्मिता वाघ यांची ओळख असून अश्या सुयोग्य महिला नेत्यांबद्दल असे लिखाण योग्य नसून कोणत्याही परिस्थितीत ही बाब  खपवून घेतली जाणार नाही अशी भावना यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील,महेश पाटील यासह उपस्थित महिलांनी व्यक्त करत सर्व महिलांनी महाजन यांच्या प्रतिक ात्मक पुतळ्यास चपलांचा मार दिला व पुतळा जाळून दहन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक देखील उपस्थित होते
यावेळी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, जि. प. सदस्या मीना रमेश पाटील, प. स. सभापती वजाबाई भिल, भाजपा महिला आघाडीच्या सुनीता बी पाटील यासह शेकडो कार्यकर्ते  उपस्थित होते.