Breaking News

भारतात महिला व बालकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य - खासदार रक्षाताई खडसे

जळगाव, दि. 18, ऑक्टोबर - रशिया येथील सेंट पीटर्सबर्ग येथे सुरु असलेल्या 137 व्या इंटर पार्लमेंट युनियनच्या एशिया पॅसिफिक ग्रुपच्या मीटिंगमध्ये आपल्या देशाच्या महिला  धोरणाविषयी खासदार रक्षाताई खडसे यांनी भाषण केले. भारत देशाने डिजिटल इंडिया कार्यक्रम राबवताना चूर्ॠेीं झश्ररींषेीा, जीवन प्रमाण आणि ग्रामीण क्षेत्रात वाय फाय हॉटस्पॉट इ  गव्हर्नन्स प्रोजेक्ट राबवले जात आहेत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जन धन योजना, आधार आणि मोबाईल बँकिंग मुळे स्त्रिया व मुलींना त्यांचे जीवनमान  उंचावण्यासाठी मिळणारे त्यांचे लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. ग्रामीण भागातील जनतेला डिजिटल इंडियाशी जोडण्यासाठी दीड लाख ग्रामपंचायतीना ब्रॉडबँडच्या मदतीने  जोडले जात आहे. आमच्या सरकारने महिला उद्योजक संघटना स्थापन केली आहे आणि या महिला उद्योजकांच्या वस्तू तसेच सेवा पुरवण्यासाठी अमेझॉन सारख्या ई कॉमर्स  वेबसाईटशी ’महिला ई हात’ या ऑनलाईन मार्केटिंग सेवा सुरू करण्याविषयी बोलणी सुरू आहेत.
आमच्या देशाचे धोरण महिलांना माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी बनवले आहे. ग्रामीण भाग आर्थिक व सामाजिक दृष्ट्या विकसित होण्यासाठी श्यामा  प्रसाद मुखर्जी रुअर्बन मिशनद्वारे ग्रामीण भागातील महिलांमध्ये डिजिटल साक्षरतेचा प्रसार केला जात आहे. सायबर सुरक्षा व महिलांची सुरक्षितता हि आमच्या सरकारची सर्वोच्च प्राथ मिकता आहे. महिला व मुलीविरोधातील सायबर सुरक्षेचे उल्लंघन व सायबर गुन्हे रोखण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी उपाययोजना केलेल्या आहेत. मानवी तस्करी रोखण्यासाठी आमच्या  देशाने मानवी तस्करी विरोधी पथके तयार केली आहेत. हि पथके मानवी तस्करी संबंधित गुन्ह्याचा तपास करतील. या मानवी तस्करीविरुद्ध लढण्यासाठी भारत सरकारने ’उज्वला’  हि व्यापक योजना सुरू केली आहे, या योजनेमुळे लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या शोषिताचे प्रतिबंध, बचाव, पुनर्वसन, पुनः एकीकरण किंवा प्रत्यवर्तन करता येऊ शकते.
याव्यतिरिक्त सरकारने ऑनलाईन उत्पीडन रोखण्यासाठी व तक्रार करण्यासाठी लेाश्रिरळपीं-ाुलवर्सेीं.ळप हा ई मेल आयडी जारी केला आहे. राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये  सायबर गुन्हे दाखल करण्यासाठी सायबर गुन्हे सेल बनवण्यात आले आहेत. नुकतीच भारत सरकारने केंद्र सरकारच्या महिला कर्मचार्‍यांना कामाठिकाणी होणारे लैंगिक शोषणाची आ ॅनलाईन तक्रार करण्यासाठी डकश-लेु (ीर्शुीरश्र हरीरीीाशपीं शश्रशलीीेंपळल लेु) सुरु केले आहे. स्त्रिया व बालकांविषयी नवीन व विविध प्रकारच्या समस्याविषयी जागरूकता व माहिती  प्रसार करण्यासाठी भारत सरकारच्या महिला व बाल कल्याण विकास मंत्रालय फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडियाचा वापर करत आहे.
स्त्रिया व बालकांविषयी नवीन व विविध प्रकारच्या लिंगविशिष्ट दुरुपयोग समस्याविषयी जागरूकता व माहिती प्रसार करण्यासाठी भारत सरकारच्या महिला व बाल कल्याण विकास  मंत्रालय फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडियाचा वापर करत आहे. या विषयावर खासदार रक्षाताई खडसे यांनी आपले मत मांडले.