Breaking News

पीएमपीच्या कंडक्टरवर ब्लेडने हल्ला

पुणे, दि. 24, ऑक्टोबर - बसमधून खाली उतरत असताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाने पीएमपीच्या कंडक्टरवर ब्लेडने वार केले. ही घटना रविवारी  (22 ऑक्टोबर) सायंकाळी पावणेपाच वाजता अप्सरा थिएटरजवळ घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक केली आहे.  सर्फराज समीर शेख (वय-19, रा.बिबवेवाडी) केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कंडक्टर सचिन चव्हाण (वय-32) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या मा हितीनुसार, अप्सरा थिएटरजवळील गिरीधर भवन बसस्टॉपवर बस थांबली असताना आरोपी सर्फराज उतरत असताना त्याने कंडक्टर सचिन चव्हाण यांच्यावर मला हात का लावला  असे विचारत त्यांच्या कानाखाली आणि मानेवर ब्लेडने वार करून सरकारी कामात अडथळा आणला आहे. स्वारगेट पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक  भोसले अधिक तपास करीत आहेत.