Breaking News

प्रेम प्रकरणातून तरुणीवर चाकू हल्ला; प्रियकराला अटक

पुणे, दि. 24, ऑक्टोबर - प्रेम प्रकरणातून झालेल्या वादात एका तरुणीवर चाकू हल्ला झाला आहे. रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास पिंपरीतील गोकुळ हॉटेलजवळ ही घटना  घडली.
या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपी बबलू शिवप्रसाद (30, रा. पिंपरी, मूळ उत्तर प्रदेश) याला अटक केली असून, जखमी तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली  आहे.जखमी तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे आरोपी बबलूशी प्रेमसंबंध होते. तर बबलूचे तरुणी आणि तिची मैत्रीण अशा दोघींशी प्रेमसंबंध होते. या दोघीही बबलूला  भेटण्यासाठी पिंपरी येथे आल्या असताना त्या तिघांमध्ये प्रेमसंबंधातून वाद झाले. यावेळी आरोपी आणि फिर्यादी यांच्यात झालेल्या वादातून बबलूने तरुणीच्या गळ्यावर व दातावर  चाकूने वार केले. यात तरुणी गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर जखमी तरुणीला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी  पिंपरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.