Breaking News

लाचखोर नाईकसह सहाय्यक पोलिस निरीक्षकास रंगेहाथ पकडले

जालना, दि. 19, ऑक्टोबर - पंधरा हजारांची लाच घेताना जालना जिल्ह्यातील एक सहाय्यक पोलिस निरीक्षक व हवालदार यांना रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे.  जालना जिल्ह्यातील सेवली येथे आज दुपारी ही घटना घडली. सेवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत बलैया आणि पोलिस नाईक विष्णू चव्हाण यांना लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाने 15 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.