Breaking News

कचराडेपो प्रश्‍नात चिनी कंपनीचा प्रवेश

औरंगाबाद, दि. 19, ऑक्टोबर - महापालिकेला चिंता शहरात रोज गोळा होणार्या कचर्याची असताना चीनच्या कंपनीची ‘नजर’ मात्र मांडकी (नारेगाव) येथील कचरा डेपोवर  असल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील कचरा नष्ट करण्यासाठी यंत्रसामुग्री उभारण्याची तयारी या कंपनीने दाखवली, परंतु रोज गोळा होणार्या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक  ती यंत्रणा उभारण्याबद्दल असमर्थता व्यक्त केली. कचरा डेपोवर कचरा आणू नका, अशी मागणी करीत मांडकीसह सुमारे वीस गावांच्या गावकर्यांची तीन दिवस आंदोलन केले. गावक र्यांचे आंदोलन संपले आणि पालिकेच्या प्रशासनाने चीनच्या चीनच्या कंपनीची डेपोवर नजर बॉस्को इनव्हारमेंटल प्रोटेक्शन टेक्नॉलॉजिकल कंपनीला पाचारण केले. कंपनीच्या प्रति निधींनी सोमवारी आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्यासह कचरा डेपोची पाहणी केली. तेथे प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबद्दल चर्चा केली आणि त्या बद्दलचे सादरीकरण मंगळवारी डॉ.  बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात केले. यावेळी महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, सभापती गजानन बारवाल, सभागृहनेता गजानन मनगटे, नगरसेवक राजू शिंदे,  दिलीप थोरात, गोकळसिंह मलके, आयुक्त डी. एम. मुगळीकर, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता डी. पी. कुलकर्णी, सिकंदर अली, हेमंत कोल्हे, भालचंद्र पैठणे  यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. कंपनीच्या प्रतिनिधींनी सादरीकरण करताना कचरा डेपोवरच लक्ष केंद्रीत केले. कचरा डेपोवरील कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी चार वर्ष  लागतील. तीस टनाचा प्लांट तेथे उभारावा लागेल. त्यासाठी पाचशे रुपये प्रतिटन, प्रती दिवस खर्च येईल. महापालिकेने तयारी दाखवल्यास 150 दिवसांत प्रकल्प उभा करू, असे  त्यांनी स्पष्ट केले. प्रकल्पासाठीची जागा, त्यावरचे बांधकाम, वीज पुरवठा, रस्ते, पाणी आदी व्यवस्था महापालिकेला करून द्यावी लागेल. सहाशे लिटर प्रतितास या प्रमाणे प्रक ल्पाला पाणी लागेल असेही सादरीकरणातून स्पष्ट करण्यात आले.