Breaking News

दुसर्‍या दिवशीही एसटीचा संप सुरू राहिल्याने प्रवाशांचे हाल

औरंगाबाद, दि. 19, ऑक्टोबर - ऐन दिवाळीत एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप आज दुसर्‍या दिवशीही सुरूच असल्याने दिवाळीनिमित्त गावी जाणार्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले  आहेत. दरम्यान, संपकरी कर्मचार्यांवर सरकारने कारवाईच्या हालचाली सुरू केल्या असल्या तरी कर्मचारी संघटना माघार घेण्यास तयार नसल्याने परिस्थिती अधिक चिघळण्याची  शक्यता आहे. संपावर गेलेले कर्मचारी आज कामावर हजर न झाल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्याजागी कंत्राटी कामगारांची भरती करण्याचा इशारा राज्य सरक ारने दिला आहे. मात्र, त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. आजही राज्यभरात एसटीचा कडकडीत बंद दिसत आहे. एकही एसटी बस रस्त्यावर उतरलेली नाही. दरम्यान, ना शिकमध्ये संपकरी कर्मचार्यांवर कारवाई सुरू झाली असून वाहन-चालकांना विश्रामगृह रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कर्मचार्यांची कोंडी करण्यासाठी असे पाऊल  अन्य ठिकाणीही उचलले जाईल, असे सांगण्यात आले. संपावर तोडगा काढण्यासाठी प्रशासन आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकार्यांमध्ये आज नव्याने चर्चा होत आहे. सर्व  संघटना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीवर ठाम असून त्याबाबत कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका या संघटना या बैठकीतही मांडणार आहेत. दुसरीकडे गेली  अनेक वर्षे आम्ही सरकारला विविध मागण्यांसंदर्भात निवेदने देत आमच्या मागण्या पुढे रेटत आहोत. मात्र सरकार अडेलतट्टू भूमिका स्वीकारत असल्याने आम्ही आंदोलनाची भूमिका  स्वीकारल्याचे कर्मचार्यांचे मत आहे.