Breaking News

ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमच्या बसवर प्रेषकाकडून दगडफेक

गुवाहटी (आसाम), दि. 11, ऑक्टोबर - ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर काल रात्री उशिरा दगडफेक झाली. अज्ञाताने सामना संपल्यानंतर  हॉटेलकडे जाणार्‍या ऑस्ट्रेलियन संघाच्या बसच्या दिशेनं एक मोठा दगड भिरकावला. ज्यात बसचं नुकसान झालं. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर  अ‍ॅरोन फिंचने याबाबत ट्विट करुन माहिती दिली.
दुसर्‍या टी ट्वेण्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेट्सने पराभव केला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ हॉटेलकडे जात होता. त्यावेळी  बसवर दगड भिरकावण्यात आला. यामध्ये बसची काच फुटली. या हल्ल्याचा फोटो अ‍ॅरॉन फिंचने ट्विट केला. हॉटेलकडे जात असताना टीम  बसच्या खिडकीवर दगड मारण्यात आला. हे खूपच भीतीदायक होतं, असं फिंचने म्हटलं आहे.