Breaking News

विकासकामांसाठी सरकारकडून सर्व प्रकारची साथ

आ. बाळासाहेब मुरकुटे यांची ग्वाही   

अहमदनगर, दि. 18, ऑक्टोबर  - निवडणूक जिंकताना जो एकोपा ठेवला, तोच एकोपा गावासाठी ठेवून विकास करताना अडवणूक करू नका. विकासकामे करताना सरकारकडून  लागणारी सर्व प्रकारच्या मदतीसाठी तुमच्या पाठीशी खंबीरपणे साथ देईल, असे आश्‍वासन आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी दिले.
मंगळवारी सकाळी लक्ष्मी मंगल कार्यालयात तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्य याच्या सत्कार समारंभ प्रसंगी आ.मुरकुटे बोलत होते व्यासपीठावर पंच गंगा सिडचे प्रभाकर ससे उपस्थित होते.
या वेळी कै राजीव राजळे,कै कुंडलिक जगताप यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आ मुरकुटे म्हणाले की, विधानसभेत ज्या पद्धतीने परिवर्तन घडवून आणले त्याच पद्धतीने  स्वाभिमानाने, निष्ठेने प्रस्थापित यांच्या विरोधात यश मिळवले आहे. थेट सरपंच निवडीमुळे नवीन नेतृत्व पुढे आले असून विकास करण्यासाठी संधी मिळाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांची ही कल्पना होती त्यामुळे घोडे बाजार,राजकीय उधळण यांना लगाम बसला असून अविश्‍वास ठराव मांडला जाणार नाही, नवीन विकास पर्व सुरू झाले असून  निवडणूक संपली त्याच बरोबर राजकारण संपवून एकविचाराने गावाच्या विकासासाठी एकत्र या
विकासकामत मी हस्तक्षेप करणार नाही सहकार्य केले जाईल विकास योजना राबवताना पात्र लाभार्थ्यावर अन्याय करू नका विकासात्मक कामांसाठी  ना हरकत प्रमाणपत्र ,द्या  अडथळे निर्माण करू नका सरकारच्या विविध प्रकारच्या योजनेचा लाभ मिळवून द्या, या वेळी नगर सेवक सुनील वाघ,डॉ,सांगळे,सरपंच आण्णासाहेब जावळे,विठ्ठल शिंदे,गेरक्षनाथ  तनपुरे भाजपा तालुका अध्यक्ष माऊली पेचे,अँड संदिप शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले
सूत्रसंचालन अशोक टेकने सर यांनी तर आभार मनोज पारखे मानले यावेळी नगरसेवक सचिन नागपुरे,रणजित सोनवणे,दिनेश व्यवहारे,दत्तात्रय बर्डे यांचे सह संजय नारळे,बाबासाहेब  रोडगे,दत्तात्रय वरूडे,प्रकाश वाघमारे,विजय पुंड,राजेंद्र शिंदे हे उपस्थीत होते.