Breaking News

आर्थिक ऐपत नसलेल्यांना अंत्यसंकाराचे साहित्य मोफत मिळावेे

डॉ. सुजय विखे यांचे प्रतिपादन

अहमदनगर, दि. 23, ऑक्टोबर - गावातील सर्वांची आर्थिक परिस्थिती सारखी नसते. काही श्रीमंत, काही गरीब तर काहींची परिस्थिती इतकी हलाखीची असते, की अशा लोकांना  अंत्यविधीसाठी साहित्य विकत घेण्याचीही भ्रांत असते. अशा लोकांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत एक चांगला उपक्रम हाती घेतला. 
या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावातील किंवा बाहेरून राहण्यास आलेल्या आर्थिक ऐपत नसलेल्या व्यक्तीला अंत्यसंकाराचे साहित्य मोफत मिळावे, अशी अपेक्षा विखे पाटील क ारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली.
राहता येथे वैकुंठयात्रा साहित्य सेवा सहकारी संस्थेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुकुंदराव सदाफळ होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, सोपानक ाका सदाफळ, डॉ. बापूसाहेब पाणगव्हाणे, विधिज्ञ रघुनाथ बोठे, अनंत लावर, संस्थेचे अध्यक्ष दशरथ तुपे, नगरसेविका सविता सदाफळ, अनुराधा तुपे, अनुराधा झळके, गंगाधर  बोठे, ज्ञानेश्‍वर वाबळे आदी उपस्थित होते.
डॉ. विखे म्हणाले, की राहता शहर परिसरातील गावांसाठी दहेगाव पाटसाठी खटकळी येथे 50 लाख रुपये खर्चून दशक्रिया विधी घाट बांधण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते  दशरथ तुपे यांच्यासारखे निःस्वार्थी कार्यकर्ते प्रत्येक गावांत तयार झाले तर गावचा विकास थांबणार नाही.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष तुपे म्हणाले, समाजात अंत्यविधीसाठी येणार्‍या अडचणी, साहित्य खरेदी करताना होणारा त्रास या बाबी विचारात घेऊन मी आणि माझ्या सहकार्यांनी अंत्य विधी आणि दशक्रिया विधीचे साहित्य उपलब्ध करून देणार्‍या संस्थेची स्थापना केली. माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ यांच्या प्रेरणेने हे करीत सुरु केले असल्याचे तुपे म्हणाले.