Breaking News

पोलिस मुख्यालयात पोलिसांचा कुटूंब मेळावा उत्साहात

बुलडाणा, दि. 17, ऑक्टोबर - 15 ऑक्टोबर रोजी पोलिस मुख्यालय बुलडाणा येथील कवायत मैदानावर दुपारी 4 ते रात्री 10 वा.पर्यंत पोलिस दिवाळी मेळावा सन-2017 सांस्क ृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस प्रशासनाचे एकदिवसीय स्नेहमिलन सोहळ्याचे उद्घाटन सौ.मीना मॅडम आणि जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकुमार मीना  यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अपर पोलिस अधीक्षक श्याम घुगे, पोलिस उप अधीक्षक सी.टी.इंगळे तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी उपस्थित  होते. पोलिस अधीक्षक शशिकुमार मीना यांनी उपस्थित अधिकारी यांचे समवेत पोलिस कवायत मैदानावर लावलेलया विविध वाहनांचे स्टॉल्स, मुलांचे खेळण्यांचे स्टॉल्स, चॉटपॉईन्ट  इत्यादी स्टॉल्सची पाहणी केली.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात पोलिस उपनिरीक्षक मोहन पाटील यांनी गणेशस्तवनाने केली. पोलिसांनी सहभाग नोंदवून आपले कलागुणांचे प्रदर्शन केले. व त्यानंतर जिल्हा पो लिस अधीक्षक शशिकुमार मीना यांच्या हस्ते शेक्षणिक क्षेत्रात घवघवीत यश संपादन केल्याबद्दल पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पाल्ल्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार क रण्यात आला. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकुमार मीना यांचे हस्ते समारंभाचे सुत्रसंचालक प्रख्यात कवी अजीम नवाज राही, बबनराव लोणीकर, अभियंता प्रशांत चौथे आणि  चांदणे स्वरांचे ग्रुपच्या कलावंतांचा यथोचित सत्कार केला. तब्बल पाच तास श्रवणसौख्याचा खजिना उधळणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांमधील सुप्तगुणांचे विराट दर्शन घडविणार्‍या पोलिस  कौटुंबिक मेळावा-2017 चे बहारदार सूत्रसंचालन अजीम नवाज राही यांनी केले. सदर कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व प्रभारी पोलिस अधीकारी  आणि 1500 ते 2000 पोलिस व त्यांचे कुटुंबियांसह उपस्थित होते. बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखील झालेल्या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी  सायबर पोलिस स्टेशन बुलडाणाचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज केदारे, सचिन परदेशी, पोलिस उपनिरीक्षक मिलींदकुमार दवणे, पोहेकाँ ज्ञानेश नागरे, पोलिस नाईक राजु आडवे,  अमोल तरमळे, योगेश सरोदे, संजय भुजबळ, पंकज गिते, सतिश मुळे, प्रशांत चौथे यांनी परिश्रम घेतले.