Breaking News

प्राजित रसिकलाल परदेशी यांनी केले माऊंट आयलॅड शिखर सर

सातारा, दि. 17 (प्रतिनिधी) : लोणंद येथील गिर्यारोहक, लोणंद फाउंडेशनचे सदस्य प्राजित रसिकलाल परदेशी यांनी नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट परिसरातील माउंट आयलँड हे  सहा हजार 183 मीटर उंचीचे शिखर सर करण्याची किमया साधली. या मोहिमेत त्यांच्यासह सारंग बेडेकर (पुणे), जान्हवी श्रीपेराम बुदुरु, श्रीनिवास (हैद्राबाद), हशींद देसाई  (मुंबई) आदी सहभागी झाले होते. 
यापूर्वी परदेशी यांनी गेल्या वर्षी आळंदी ते पंढरपूर हा पालखी मार्गावरील प्रवास 58 तासांत पायी चालून रेकॉर्डब्रेक कामगिरी करत लिम्का बुक ऑफ रेर्कार्डमध्ये विक्रम नोंदवला  आहे. गणेशोत्सवादरम्यान त्यांनी अष्टविनायक यात्राही पायी चालून पूर्ण केली होती. आता नेपाळमधील हे शिखर सर करण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. त्यांना पुण्यातील गि रिप्रेमी संस्थेचे ज्येष्ठ गिर्यारोहक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते उमेश झिरपे व सातार्‍याचे एव्हरेस्टवीर आशिष माने यांचे मार्गदर्शन लाभले.
या मोहिमेबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार, राम शिंदे, विक्रम पावसकर, लक्ष्मणराव शेळके-पाटील, पुरुषोत्तम जाधव आदींनी अभिनंदन केले.