Breaking News

बोर्डी नदीवरील विसंर्जन घाटाची लागली वाट!

विसर्जन घाटाची स्वच्छता न कल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर

बुलडाणा, दि. 17, ऑक्टोबर - ऐतिहासिक काळापासुन दरवर्षी जगदंबा देवीच्या मुर्तीचे घाटपुरी येथील बोर्डी नदीच्या पात्रात विसर्जन करण्यात येते. मागील वर्षी  मोठा गाजावाजा  करुन याठिकाणी देवी विसर्जन करण्याकरीता विसर्जन घाट तयार करण्यात आला होता. मात्र काही महिन्यातच या विसर्जन घाटाची वाट लागली असुन सद्यस्थितीत घाटपुरी येथे  ज्या ठिकाणी देवी विसर्जन केल्या जाते. तेथे मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी कोणतीही साफसफाई करण्यात आली नाही.  या विसर्जन  घाटच्या ठिकाणी स्वच्छता न केल्यामुळे भाविकांनी आपली नाराजी व्यक्त केली व मोठी देवी विश्‍वस्त मंडळासह इतर जगदंबा मंडळांनी सुध्दा घाटपुरी येथे देवीचे विसर्जन न क रण्याचा निर्णय घेतला.
यावर्षी 14 ऑक्टोंबर रोजी जनुना तलाव येथे मोठी देवीसह इतर अनेक मंडळांनी सुध्दा जगदंबा मुर्तीचे विसर्जन केले. ऐनवेळी जनुना तलाव येथे विसर्जन करण्याचे ठरले. मात्र या  ठिकाणी पर्याप्त सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याने काही देवीच्या मुत्र्या पाण्यावरच तरंगत होत्या व तलावाच्या काठावर मोठया प्रमाणात कच-याचे ढिग साचले होते. यामुळे तलावाचे  पाणी दुषित होत आहे. यंदा अत्यल्प पाउस झाल्यामुळे अद्याप गावागावातील धरणे रिकामी आहेत तसेच अनेक विहिरींनी तळ गाठलेला आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात नागरिकांना  तीव्र पाणी टंचाई भासणार आहे. शहरातील शेकडो नागरिक दररोज जनुना तलाव येथे पोहण्यासाठी येतात. तसेच या तलावाच्या पाण्याचा वापर रेखा प्लॉट व सतीफैल भागातील  नागरिक करीत असतात.
काही दिवस अगोदर नगर पालीकेच्या वतीने शहरातील घंटागाडी कचरा संकलन करणार्‍या व्यक्तीने जनुना तलावात कचरा फेकुन पाणी दुषित करण्याचा प्रकार घडला होता.  गणेशोत्सवादरम्यान अनेक मंडळांनी आपल्या मंडळांच्या गणेश मुर्त्या जनुना तलाव येथे विसर्जन केले होते. व आता जगदंबा देवीच्या मुर्तीसह अनेक मंडळाच्या देवीचे सुध्दा या ठिक ाणी विसर्जन करण्यात आल्याने जनुना तलावाचे पाणी आणखीनच दुषित झाले आहे. नगर पालीकेच्या वतीने जनुना तलावाची सफाई करण्यात यावी अशी अपेक्षा नागरिकांकडुन  होत आहे.