Breaking News

महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी संपुर्ण जिल्हाभर दारू बंदीसाठी निघणार ‘मशाल मार्च’

मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातून दारू हद्दपार करण्यासाठी अभियानाचा प्रारंभ  

चिखली, दि. 01, ऑक्टोबर - राष्ट्रमाता जिजाउ मॉ साहेबांच्या पावनस्पर्शाने पुणित झालेल्या मातृतिर्थ बुलडाणा जिल्हयातून दारू हद्पार करण्यासाठी गाव  पातळीवर सुरू असलेल्या लढयाला एकत्रित करून आणी लोकचळवळीत रूपांतरीत करून दारूमुक्तीचा निर्धार प्रत्यक्षात आणन्यासाठी हिरकणी महिला उत्कर्ष  प्रतिष्ठाण यांच्या पुढाकाराने बुलडाणा येथे दारूमुक्ती निर्धार परीषदेचे आयोजन 15 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. त्या निर्धार परीषदेत या लोकचळवळीव्दारे  दारूमुक्तीसाठी विविध अभियान तालुका व जिल्हा पातळीवर राबविण्याचे आयोजक व संयोजकाच्या वतीने निश्‍चित करण्यात आले होते. त्यानुसार महात्मा गांधी  यांच्या जयंतीदीनी 2 ऑक्टोंबर रोजी संपुर्ण जिल्हाभर विविध सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या संघटना, संस्था आणी दारूबंदीसाठी अहोरात्र परिश्रम घेणारे  कार्यकर्त्यांकडून मशाल मार्च चे आयोजन करण्यात आले आहे.
दारूमुक्तीसाठी सुरू झालेल्या या अभियानात 02 ऑक्टोंबर 2017 रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून मशाल मार्चच्या रूपाने अभियान प्रारंभ होते आहे.  या अभियाना अंतर्गत जिल्हयातील प्रत्येक तालुक्या तालुक्यात आणी गाव पातळीवर दारूबंदीसाठी परीश्रम घेणार्‍या रणरागींनी बरोबरच सामाजिक कार्यकर्ते, संस्था,  संघटना यांनी तालुका स्तरीय मशाल मोर्चाच्या माध्यमातून जिल्हा दारूमुक्तीचा हा निर्धार सर्वदुर पोहचवायचा आहे. या अभियानात बुलडाणा येथे सायंकाळी 7  साजता जिल्हा परिषद मधे महात्मा गांधी पुतळयापासून मशाल मार्चला प्रारंभ होणार असून हा मार्च हुतात्मा गोरे स्मारका पर्यंत पदक्रमन करणार आहे. तर चिखली  येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापासून सायंकाळी 6 वाजता या मशाल मार्चला प्रारंभ होणार आहे. वरील दोन्ही ठिकाणी दारूमुक्ती निर्धार परिषदेचे मुख्य  संयोजक आमदार राहुलभाउ बोंद्रे, हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा अ‍ॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे यांचेसह मान्यवर सहभागी होणार आहे. या  मशाल मोर्चात प्रत्येक तालुक्यातील काढण्यात येवून गावा गावातील कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन दारूमुक्ती निर्धार परिषदेच्या संयोजक नरेंद्र लांजेवार,  प्रेमलता सोनुने, रणजित राजपुत, गणेश वानखेडे, सुनिताताई भांड, राजेंद्र वानखेडे, ज्योतीताई ढोकणे, पंजाबराव गायकवाड, मंजितसिंग शिख, हिरकणी महिला  उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या ज्योतीताई बियाणी, शोभाताई सवडतकर, विद्याताई देशमाने यांनी केले आहे.
सुखी जिवनाला लागलेले ग्रहन म्हणजे दारूचे व्यसन, यामुळे संसार उद्वस्त होवून देशोधडीला लागतो हे चित्र सर्वानीच पाहिले आणी अवतीभोवती आनुभवले आहे.  हा शाप मातृतिर्थ बुलडाणा जिल्हयातून दुर करायचा हा निर्धार दारूमुक्ती निर्धार परिषदेतून मान्यवरांचे आणी दारूमुक्तीसाठी आपले आयुष्य पणाला लावणार्‍यांच्या  उपस्थितीत व्यक्त झाला आहे. त्यासाठी महात्मा गांधीजी यांच्या जयंती पासून दारूमुक्तीसाठी व्यापक अभियान मशाल मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाभर सुरू होते  आहे. हे एक दोघांचे नव्हे तर समाजाच्या हितासाठी झटणार्‍या आणी सामाजिक सुधारणेचा वसा घेणार्‍या सर्व संस्था, संघटना यांनी सामुहिकपणे केल्या जाणार्‍या  प्रयत्नातुन साध्य होवु शकणारे अभियान त्यासाठी अशा सर्व संस्थांनी कुठलाही किंतु-परंतु मनात न बाळगता निव्वळ समाजहित हा उदे्ष ठेवून या अभियानात  सहभागी व्हावे आणी मातृतिर्थ बुलडाणा जिल्हयातून दारू हद्पार करण्यासाठी सहायभुत व्हावे अशी विनंती हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा  अ‍ॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे यांनी केली आहे.