Breaking News

महेश विद्या मंदीरच्या अनुष्का मलोसेची राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेसाठी निवड

मेहकर, दि. 01, ऑक्टोबर -  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने 25 ते 27 सप्टेंबर  दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे  विभागीय टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बुलडाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वाशिम,  अकोला मनपा, अमरावती मनपा या जिल्ह्यांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत कु.अनुष्का मलोसे हिने विजय संपादन केला. 
महेश विद्यामंदीर मेहकर येथे वर्ग 6 व्या वर्गात शिकत असलेली कु.अनुष्का संदीप मलोसे हिने वाशिम येथे 25 ते 27 सप्टेंबर 2017 या कालावधीत झालेल्या  विभागीय टेनिस स्पर्धेत 14 वर्ष वयोगटात पहिल्या सामन्यात कु.वैष्णवी देशपांडे, अमरावती हिचा पराभव केला तर दुसर्‍या सामन्यात कु.सुप्रिया उचितकर, अमरावती  हिचा पराभव केला. तसेच अंतिम सामन्यात पलासी जाजु हिच्यासोबत सामना खेळून 14 वर्ष वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावून राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेसाठी  आपली निवड निश्‍चित केली. महेश विद्यामंदीरचे अध्यक्ष सुभाषजी लोहिया, प्राचार्या सौ.मंत्री मॅडम यांनी अनुष्काचे अभिनंदन केले. अनुष्काला वडील संदीप मलोसे  व टेनिस प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.