मनपातील सेवानिवृत्तांचा सत्कार संपन्न
अहमदनगर, दि. 09, ऑक्टोबर - कर्मचारी कल्याण निधीच्या वतीने अ.नगर मनपातील सेवानिवृत्त कर्मचार्यांचा महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आयुक्त घनश्याम मंगळे, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, सभागृहनेते गणेश कवडे, महिला बालकल्याणच्या सभापती सारिका भुतकर, सहा. आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त विक्रम दराडे, मिलिंद वैद्य, श्रीधर देशपांडे, प्रकाश कुरलिया, अंशीराम आढाव, संगीता झोडगे, सुरेखा सग्गम, शंकरराव बहिरवाडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर सुरेखा कदम म्हणाल्या की, महापालिकेच्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांना शहराची खडान्ेखडा माहिती होती. नगर शहरात पाणी सोडणारे, स्वच्छता ठेवणारे, पथदिवे सुरू करणारे, तसेच केअर टेकर आज सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या कामामुळे नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा मिळत होत्या. त्यांची उणीव मनपाला निश्चितच भासत राहील. त्यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या अनुभवाच्या शिदोरीचा इतर कर्मचार्यांना उपयोग करून द्यावा, असे सांगितले.
आयुक्त घनश्याम मंगळे म्हणाले की, कर्मचारी कल्याण निधीच्या माध्यमातून कर्मचार्यांसाठी चांगले काम केले जात आहे. या कर्मचार्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेची सेवा करण्यासाठी वेचले आहे. त्यांचा सेवानिवृत्तीबद्दल यथोचित गौरव करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. या कर्मचार्यांना शहराची चांगलीच माहिती होती. ते आज जरी सेवानिवृत्त झाले असले, तरी त्यांची मनपाला कायमच गरज असणार आहे, असे सांगितले.