Breaking News

मनपात सफाई कर्मचार्‍यांच्या समस्यांवर मार्गदर्शन

। सफाई कर्मचारयांच्या रिक्त पदावर भारती करण्यात यावी - पवार 

अहमदनगर, दि. 17, ऑक्टोबर - महापालिकेकडून सफाई कर्मचार्‍यांसाठी शासनाने दिलेल्या सवलती, योजनांची  अंमलबजावणी केली जात नाही. कर्मचार्‍यांच्या आरोग्याबाबत कु ठल्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्याचप्रमाणे त्यांना मंजूर असलेले भत्तेही दिले जात नसल्याच्या शब्दांत सफाई कर्मचारी आयोगाने मनपाच्या कारभारावर नाराजी दर्शवली आहे.  याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करणार असून कारवाईची शिफारस करणार असल्याचे आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 वर्षे मृत अवस्थेत असलेल्या या आयोगाला संजीवनी दिल्याचे त्यांनी सांगीतले. आयोगाच्या सदस्यांनी नुकतीच (दि.16) महापालिकेत  बैठक घेऊन सफाई कर्मचार्‍यांचे प्रश्‍न, त्यांना दिल्या जाणार्‍यां सवलती, योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले की, सफाई कर्मचारी  घाणीत काम करतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा विचार करून शासनाने घाण भत्ता लागू केला. यातून काम केल्यानंतर त्यांना प्रतिकार शक्ती वाढावी, असा आहार घेता येईल, या  उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. मात्र, नगर महापालिकेने अद्यापही याची अंमलबजावणी केली नाही. सफाई कर्मचार्यांना वर्षातून दोन वेळा गणवेश, गम बूट, ग्लोज, मास्क उपलब्ध  करून देणे बंधनकारक आहे. मात्र, तेही दिले जात नाहीत. कर्मचार्‍यांच्या कालबध्द पदोन्नत्तीची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यांच्यासाठी घरकूल योजना राबविण्याचे सरकारचे निर्देश  आहेत. मनपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना राबविली आहे. मात्र, त्यातही निकषांची किती अंमलबजावणी होते, किती कर्मचार्यांना लाभ मिळेल, याची खात्री दिली  जाऊ शकत नाही. महापालिका प्रशासन सफाई कर्मचार्यांबाबत गंभीर नसल्याचे सांगत बैठकीत समोर आलेल्या बाबींचा अहवाल शासनाकडे सादर करून संबंधितांवर कारवाईची  शिफारस करणार असल्याचेही रामुजी पवार यांनी सांगितले.