Breaking News

नगरसेवकांच्या पुढाकाराने कुष्ठपिडितांची दिवाळी!

अहमदनगर, दि. 17, ऑक्टोबर - महापालिकेकडून शहरातील कुष्ठपिडितांना दिल्या जाणार्‍यां अनुदानाचा प्रस्ताव अद्यापही मंजुरीच्याच प्रतिक्षेत आहे. त्यामुळे  या  कुष्ठपिडितांची  दिवाळी उत्साहात साजरी व्हावी, यासाठी मनपाती काही नगरसेवकांनी स्वतः पुढाकार घेत त्यांना रोख स्वरुपात आर्थिक मदत केली. विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते  16 जणांना प्रत्येकी 1100 रुपयांच्या मदतीचे काल (दि.16) वितरण करण्यात आले.
सर्वसाधारण सभेत कुष्ठपिडितांना दरमहा मानधन देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, याच्या अंमलबजावणीसाठी शासनाची मंजुरी आवश्यक असून प्रस्तावही अद्याप  मनपास्तरावरच रखडला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून अनुदानासाठी मनपाचे उंबरठे झिजविणार्‍या कुष्ठपिडितांची दिवाळी उत्साहात साजरी व्हावी, यासाठी विरोधी पक्ष नेते  बाळासाहेब बोराटे, नगरसेवक संजयकुमार लोंढे, मुदस्सर शेख, काका शेळके, संपतराव नलवडे, सुनील सोनवणे, किसनराव भिंगारदिवे, विशाल वालकर आदींनी पुढाकार घेत 16  कुष्ठपिडितांना रोख मदत केली. प्रत्येकी 1100 रुपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आले. कुष्ठपिडित संघटनेचे अभिमन्यू चव्हाण यांनी नगरसेवकांनी पुढाकार घेऊन दिवाळी गोड के ल्याने सर्वांचे आभार मानले.