Breaking News

स्वयंसेवी संघटनांच्या वतीने वसुबारस साजरा

स्वामीनाथन शिफारसीला किसान क्रांती ग्रंथ साहेब उपाधीने मानवंदना

अहमदनगर, दि. 17, ऑक्टोबर - पिपल्स हेल्पलाईन, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन व भारतीय जनसंसदच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे वसुबारस निमित्त गाईचे पूजन क रण्यात आले. तर शेतकर्‍यांसाठी नवसंजीवनी ठरणार्‍यां स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीच्या पूजनाने त्याला किसान क्रांती ग्रंथ साहेबच्या उपाधीची मानवंदना देण्यात आली. 
यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे, विजय हजारे, तुकाराम टिमकरे, शाहीर कान्हू सुंबे, ओम कदम, अंबिका नागुल, हिरामल थोरात, अर्चना आढाव, हिराबाई  ग्यानप्पा, अनिता कासार, विठ्ठल सुरम, शांता खुडे, मिनहाज पठाण, पंढरीनाथ बोरुडे, नारायण भोजने आदि उपस्थित होते.
हुतात्मा स्मारक येथे घेण्यात आलेल्या वसुबारसच्या कार्यक्रमा निमित्त परिसरात आकर्षक रांगोळी काढून पणत्या प्रज्वलीत करण्यात आल्या होत्या. उपस्थितांना सेंद्रीय शेती पिक विण्याचे व प्रदुषण टाळण्यासाठी वृक्षरोपणाने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले. रासायनिक खतांच्या अतिवापराने मोठ्या प्रमाणात जमीन नापिक होवून,  त्या पिकांचे दुष्परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होत आहे. यासाठी सेंद्रीय शेती पिकविण्यासाठी शेतकर्‍यांना गाईसाठी शंभर टक्के अनुदान तर अर्थसहाय्य देण्याची शासनाकडे मागणी क रण्यात आली. दिवाळी गोड होण्यासाठी लाडू वाटप करुन महाराष्ट्रात घरकुल हमी कायदा लागू करण्याची आशा घरकुल वंचितांनी व्यक्त केली.