Breaking News

अपघातात मृत्यूमुखी पावलेल्या वारसांना 43 लाखांची नुकसान भरपाई

अहमदनगर, दि. 17, ऑक्टोबर - नेवासे तालुक्यातील तालुक्यातील हंडीनिमगाव शिवारात त्रिमूर्ती गॅस एजन्सीसमोर, नगर-औरंगाबाद रस्त्यावर अपघात झाला. 27 जानेवारी  2015 रोजी सुनील तुकाराम रणपिसे हे त्यांचे मित्र राजेंद्र फडके रवींद्र देशपांडे यांच्याबरोबर पुण्याहून औरंगाबादकडे फडके यांच्या चारचाकी (एमएच 12 जीएफ 7462) त्यांच्या ब ँकेतील कामासाठी जात होते.  रणपिसे यांच्या डोक्यास गंभीर मार लागला ते त्याच दिवशी मरण पावले. 
अपघातातमरण पावलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या झोनल मॅनेजरच्या वारसांना 43 लाखांची नुकसान भरपाई देण्यात आल्याची माहिती ड. अक्षयकुमार मोहिते यांनी दिली.
 नेवासे परिसरातील ही सर्वात मोठी भरपाई असल्याचे सांगितले जाते.  रणपिसे यांच्या पत्नी सुनंदा, मुलगा मिथिलेश, मुलगी अदिती आई वेणूबाई यांनी गाडी मालक चालक राजेंद्र  फडके बजाज अलायन्झ इन्शुरन्स कंपनीविरुद्ध नेवासे येथे मोटार अपघात न्यायधीकरणात नुकसान भरपाईसाठी दावा केला होता.
या दाव्यामध्ये अर्जदार प्रतिवादी बजाज अलायन्झ जनरल इंशुरन्स कंपनी यांनी प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना सदर प्रकरण न्यायाधीश ए. एल टिकले यांच्या न्यायालयात  तडजोडीसाठी ठेवून विमा कंपनी अर्जदार यांच्यामध्ये तडजोड होऊन प्रतिवादी बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीने रणपिसे यांच्या वारसांना 43 लाख नुकसान भरपाई  देण्याचे मान्य केले.
 मोटार अपघात न्यायाधिकारणाचे सदस्य न्यायाधीश टिकले यांनी प्रकरण निकाली काढले. अर्जदारांतर्फे वकील ड अक्षयकुमार मोहिते ड. संदीप बी. राजे भोसले यांनी बाजू मांडली.
अपघातात मरण पावलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या झोनल मॅनेजरच्या वारसांना 43 लाखांची नुकसान भरपाई देण्यात आल्याची माहिती ड. अक्षयकुमार मोहिते यांनी दिली. नेवासे प रिसरातील ही सर्वात मोठी भरपाई असल्याचे सांगितले जाते.