Breaking News

सुबोध सावजी यांची आदिवासी महिलांसोबत भाऊबीज

बुलडाणा, दि. 27, ऑक्टोबर - जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत सण उत्सव साजरे करुन त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावे, या उदात्त  हेतून माजीमंत्री सुबोध सावजी यांनी तालुक्यातील आदिवासी गाव असलेल्या चाळीस टापरी, मोठे गोमाल छोटे गोमाल या आदिवासी गावातील भगिनींसोबत भाऊबीज साजरी केली.  यावेळी त्यांना ब्लँकेटचे देखील वाटप करण्यात आले. 
मागील अकरा वर्षांपासून माजीमंत्री सुबोध सावजी हे रक्षाबंधन आणि भाऊबिजेचा सण आदिवासी गावात साजरा करतात. आतापयर्ंत त्यांनी आदिवासी बहुल असलेल्या सायखेडा,  भिंगारा, जनूना अशा विविध गावांमध्ये जाऊन त्यांनी भाऊबिज आणि रक्षाबंधन हे उत्सव साजरे करुन आदिवासीं बांधवांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण केले आहेत.या आ दिवासी गावात पिण्याचे पाणी एक ते दीड किलोमिटरवरुन आणावे लागते, रस्ता नाही, विद्युत व्यवस्था नाही, गावातील एकही घर, वीट, सिमेंट, बांधकामाचे नाही. या गावांना  अजूनही महसूल दर्जा मिळालेला नाही. अशा गावांमधील आदिवासी भगिनींना आधार देण्याचा उपक्रम माजी मंत्री सुबोध सावजी यांनी हाती घेतला आहे. चाळीस टापरी या गावात  देखील सावजी दरवर्षी भाऊबिज साजरी करतात. या गावात पिण्याच्या पाण्यासाठी खोदलेली विहिर पाहण्यासारखीआहे. विहिर जेथपयर्ंत खोदली तेथपयर्ंत एकसंघ एकच दगड आहे.  या विहिरीला पाणी लागलेच नाही हा दगड खाली फोडल्याही जात नाही, हे विशेष.
चाळीस टापरी, मोठे गोमाल आणि छोटे गोमाल या तिन्ही गावातील 190 महिलांनी सुबोध सावजी यांनी भाऊबिज निमित्त ब्लँकेट वाटप केले. यावेळी वा. रा. पिसे, अर्जून घोलप,  अबरार खान मिल्ली, अरूण ताडे, माया धांडे, चंद्रकांत माने, पांडुरंग ताडे, गणेश उमरकर, रामीम देशमुख, अश्‍विन राजपूत, प्रताप डावर, ग्यानसिंग वाचफुले, ना. कु. किराडे, रेखा  खिराडे, श्याम कुंडकर, सुमारसिंग मुजेलडा, गुरलीबाई, रुख्मीनाबाई, ज्योत्स्नाबाई, मिलीबाई, उमरीबाई, कान्हीबाई, कमलीबाई यांच्यासह आदिवासी बांधव महिलांची उपस्थिती  होती.