Breaking News

रस्ता दुरुस्तीसाठी प्रहारचे आमरण उपोषण

बुलडाणा, दि. 27, ऑक्टोबर - कुंबेफळ ते टाकळी जाणार्‍या रस्त्याची दुरुस्थि करण्यात यावी, या मागणीसाठी आज 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजतापासून प्रहार जनशक्ती  पक्षाच्या वतीने टाकळी फाट्यावर आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात आला. उपोषणकर्त्यांनी आपल्या उपोषणाचा टेंट भररस्त्यात ठोकल्याने रास्तावाहतुकीचा चांगलाच खोळंबा  झाला. अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली.
टाकळी (ता. बुलढाणा) गावाची लोकसंख्या दिडहजारावर आहे. गावात कुठलीच सुविधा उपलब्ध नसल्याने गावकर्‍यांचे सगळे व्यवहार धाडवर अवलंबून आहे. त्यामुळे दररोज शेकडो  नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना धाड येथे जावे लागते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून टाकळी गावाकडे जाणारा कुंबेफळ ते टाकळी रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्याचे  मोठमोठे खड्डे पडल्याने या मार्गावरील संपूर्ण वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. त्यामुळे नागरिक व शालेय विध्यार्थ्यांना 10 किलोमीटरचा प्रवास पाई करावा लागत आहे. नव्हे खराब  रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रात्री अपरात्री दवाखान्याच्या कामानिमित्त जाणार्‍यांचे तर प्रचंड हाल होत आहे. त्यामुळे सदर रस्त्याची दुरुस्थि करण्यात यावी अशी  मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती. वारंवार निवेदने देऊन व विनंती करून सुद्धा बांधकाम विभागाने दखल घेतली  नसल्याने कुंबेफळ  ते टाकळी जाणार्‍या रस्त्यावर अवघडराव सावंगी फाट्यावर आज 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजतापासून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मो हिते यांच्या नेतृत्वात उपजिल्हाप्रमुख निलेश गुजर, तालुकाप्रमुख प्रदीप टाकसाळ, सोशल मीडिया प्रमुख शुभम लहाने, टाकळी शाखाप्रमुख सुनील उगले, गणेश नागवे,भगवान पांडे  ,विशाल शिंबरे ,शरद उगले,समाधान जाधव,गजानन नागवे,अर्जुन सुस्ते(मा.सरपंच) दिलीप हावरे,राजू नागवे(मा.सरपंच)अंकुश तायडे,रामेश्‍वर नागवे,किरण दराडे, शुभम पंडित,गणेश  उगले,सागर जट्टे, प्रमोद सिनकर, संदीप गाडेकर,गोपाळ वाघूर्डे,कैलास डुकरे,गणेश जाधव,गंगाराम उगले, योग पालकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी भररस्त्यात टेंट ठोकून आमरण  उपोषणास प्रारंभ केला आहे..!!
अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे कुंबेफळ ते टाकळी व कुंभेफळ ते अवघडराव सावंगी रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे..!येत्या 24 तासांत आंदोलनाची दाखल  न घेतल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास काळे फासण्याचा इशारा देखील प्रहारच्या वतीने देण्यात आला आहे..!