Breaking News

बिग बींना राज ठाकरेंच्या अनोख्या शुभेच्छा

मुंबई, दि. 11, ऑक्टोबर - अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आज 75 व्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या  खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
माझी भूमिका मराठी भाषेच्या संदर्भात असल्याने ती आजसुद्धा कायम आहे’ असे राज यांनी या व्यंगचित्राविषयी म्हटले आहे. 2008 च्या  सुमारास राज यांनी मराठीचा मुद्दा उचलल्यानंतर त्यांनी थेट अमिताभ यांना लक्ष्य केले होते. काही वर्षांपूर्वी माझा अमिताभ बच्चन  यांच्याशी वाद झाला. त्याचे स्पष्टीकरण मी दिले. माझी भूमिका मराठी भाषेच्या संदर्भात होती. आजसुद्धा ती कायम आहे. त्यांच्या समोर मी  ती मांडली देखील आहे. मतभेद असले तरीही अमिताभ यांच्या वैभवशाली कलाकिर्दीबद्दल, श्रेष्ठत्वाबद्दल माझ्या मनात शंका नव्हती, आजही  नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.