अंधेरी पश्चिममधील जे.पी. मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई
मुंबई, दि. 11, ऑक्टोबर - अंधेरी पश्चिम येथील मेट्रो रेल्वे खालील जे.पी. मार्गसह स्थानक परिसरातील सर्व फेरीवाल्यांसह अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. या भागातील वाहतूक जोपर्यंत सुरळीत सुरु होणार नाही तोपर्यंत कारवाई सुरुच राहिल असे, के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.
अंधेरी पश्चिम येथील मस्जिद गल्ली अर्थात चप्पल गल्लीसह रेल्वे स्थानक परिसरातील सर्व फेरीवाल्यांसह अतिक्रमणांवर कडक कारवाई क रण्यात आली आहे. मुंबईतील रस्त्यांवरील तसेच पदपथांवरील अतिक्रमणांविरोधात महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशानंतर धडक कारवाई हाती घेण्यात आली आहे.