Breaking News

आय.ए.एस. अधिकार्‍यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

बुलडाणा, दि. 24, ऑक्टोबर - स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करिअर करणार्‍या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे त्यांच्यातील असलेल्या शंका कुशंका दूर व्हाव्यात या उद्देशाने शिवसाई  नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने पाडव्याच्या शुभमूहुर्तावर आयोजित फराळ विथ आय.ए.एस कार्यक्रमामधून करण्यात आले. 
बुलडाण्याचे सुपूत्र असलेले व सध्या सांगली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले आय.ए.एस. अभिजीत राऊत, गुंटूर येथे उपजिल्हाधिकारी पदावर असलेले स्वप्नील पुंडकर व  नागपूर येथे असलेले सब कमिशनर स्वप्नील पवार या तिन्ही अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मनातील प्रश्‍नाचे उत्तरे दिली. त्यांच्यासोबत  मनसोक्त गप्पा केल्या व स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला. हे सर्व अधिकारी परिवारासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी बुलडाण्यात आले होते. आय.ए.एस. अभिजीत  राऊत म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जीवनात जर कन्सेप्ट, कॉन्सट्रेशन, को-ऑर्डीनेशन, कूप्याबिलीटी व कव्हरेज या पाच ’सी’वर लक्ष दिले तर जिवनातील कोणतीही परिक्षा आपण  उत्तम प्रकारे पास होवु शकतो.
स्वप्नील पुंडकर यांनी यशस्वी होण्यासाठी आपणासमोर रोल मॉडल असले पाहिजे, स्पर्धा परिक्षेची तयारी शालेय जिवनापासून केली पाहिजे, असे प्रतिपादन केले. तर आय.ए.एस.  स्वप्नील पावार यांनी विद्यार्थ्यांनी अल्यास करतांना कोणकोणत्या गोष्टी टाळाव्या, अभ्यासात सातत्य कसे ठेवावे याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक  राजेंद्र राऊत होते तर जि.प.सदस्य डी.एस. लहाने, शिवसाई पतसंस्थेचे अध्यक्ष दौलतराव नरवाडे, उपाध्यक्ष बबनराव पवार, संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डी.एस.  लहाने यांनी प्रास्ताविकातुन कार्यक्रमाचा उद्देश विषद करुन समाजाची, देशाची सेवा करण्यासाठी तरुणांनी स्पर्धा परिक्षेमध्ये करिअर करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन गोकुळ कोल्हे यांनी केले.
कार्यक्रमाला असंख्य विद्यार्थ्यांसह पालक उपस्थित होते. शिवसाई पतसंस्थेने आयोजित केलेल्या या आगळयावेगळया कार्यक्रमाचे पालकांनी व विद्यार्थ्यांनी कौतुक केले. क ार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य मोहरकर, संचालक रमेश देशमुख, रामकृष्ण लहाने, निलेश गाडेकर, संजय लोखंडे, रामु चौधरी, हिम्मत टेकाळे, कापडे, सुसर, मंगल मुळे यांनी  परिश्रम घेतले.
या कबडड्ी स्पर्धेमध्ये जवळपास 30 संघ सहभागी झाले असुन स्पर्धेचे प्रथम बक्षीस 21 हजार रुपये माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या तर्फे, द्वितीय बक्षीस 15 हजार  रुपये भरतसिंग कटयारसिंग चव्हाण यांच्या तर्फे,तृतीय बक्षीस 11 हजार रुपये गणेषभाउ चैकसे यांच्या तर्फे तर चतुर्थ बक्षीस 7 हजार रुपये षैलेंद्र चव्हाण, किरणसिंग चव्हाण,  ज्ञानेष्वर सिसोदे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे.