Breaking News

मुंबईतील रस्त्यांवर लवकरच सशुल्क वाहनतळाची सोय ?

मुंबई, दि. 23, ऑक्टोबर - मुंबईतील वाहनांच्या वाढत्या संख्येमुऴे वाहतूक पोलिसांनी सशुल्क वाहनतळांची मागणी केली आहे. त्यामुळे आता वाहतुकीला अडथळा होणार नाही,  अशा ठिकाणी महापालिकेचे विभाग कार्यालय आणि वाहतूक पोलीस यांच्या समन्वयाने रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर वाहनतळ चालवण्याचे धोरण अवलंबले असल्याची माहिती महापा लिकेने दिली आहे. त्यामुळे लवकरच ही वाहनतळ सुरु करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई महापालिकेने जानेवारी 2015 मध्ये सशुल्क वाहनतळ धोरण बनवले असून या धोरणाला प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. मात्र ही स्थगिती उठवण्यात आल्यानंतर  महापालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत या धोरणाची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरु करण्यात येत आहे. यासाठी ‘ए’ विभागातील सशुल्क वाहनतळासाठी निविदा क ाढण्याची प्रक्रिया सुरु असून त्यामध्ये महिला बचत गट, सुशिक्षित बेरोजगार आणि खुल्या गटांमध्ये विभागून हे कंत्राट दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.