Breaking News

लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक करणा-या तरुणास अटक

ठाणे, दि. 23, ऑक्टोबर - लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणा-या तरुणाला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. भिवंडी शहरातील समरूबाग येथे घरकाम करणा-या 21  वर्षीय तरुणीला अब्दुल आहाद अ. कलाम अंसारी या तरुणाने लग्नाचे आमिष दाखविले. मात्र ती गरोदर असल्याचे समजताच अंसारीने लग्नास नकार दिला. याप्रकरणी पोलिसांनी  त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.