Breaking News

‘साईकृपा’ पहिला हप्ता अडीच हजार देणार - पाचपुते

अहमदनगर, दि. 23, ऑक्टोबर - यंदा ऊसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकर्‍यांना त्याच्या मालाचे मोल चांगले मिळाले पाहिजे आणि सर्वाच्या बरोबरीने राहुन ईतर साखर क ारखान्यापेक्षा ऊस भावात पुढे राहुन टनामागे 50 रुपये जास्त देऊन यंदाच्या गळीत हंगामातील ऊसाला पहिला हप्ता 2 हजार 500 रुपये व काटा पेमेंट देणार असल्याची माहिती  साईकृपा साखर कारखान्याचे अध्यक्ष  सदाशिवराव पाचपुते यांनी बोलताना सांगितले.
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील साईकृपा शुगर अन्ड अलाईड इंडस्ट्रीज या साखर कारखान्याचा पंधरावा गळीत हंगाम दिपावली पाडव्याच्या शुभमुहुंतावर मान्यवरांच्या हस्ते पार  पडला त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते.
यावेळी माजी मंत्री पाचपुते बोलताना म्हणाले यंदा पाऊस भरपूर झाल्याने पुढील वर्षी तालुक्यात 40 ते 45 लाखटन अतिरिक्त ऊसाचे उत्पादन  होणार आहे.
ऊस जास्त  झाला म्हणून अर्धा एकर ऊस लावा म्हणून श्रीगोंदा कारखान्याने सभासदांना फतवा काढला म्हणून जादा झालेल्या ऊसाचे काय करायचे यासाठी शेतकर्‍यांना न्याय  मिळावा म्हणून खाजगी कारखाना काढला आणि विरोधकांचा पोटसुळ उठला आणि आमच्यावर सहकार विरुध्द खाजगी असे मोठे आरोप केले. निवडणूकित म्हणाले खाजगीच्या  ताब्यात सहकारी कारखाना दिला तर मोठे नुकसान होईल सहकारातला माल खाजगीत जाईल आणि मग आमच्या वर आरोप करणार्‍यानी परभणीला 130 कोटीचा खाजगी साखर  कारखाना का घेतला आता ईकडचा माल तिकडे जाणार नाही हे कशावरुन  म्हणत पाचपुते म्हणाले ज्या जिल्हा बकेला आम्ही 48 कोटी रुपये व्याज भरले त्याच बँकेने आम्हाला 6  कोटीचे कर्ज नाकारले आणि ईतरांना मात्र शंभर कोटीच्या पुढे कर्ज दिले तेथूनच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला तालुक्यात आमच वाटोळ करण्यासाठी सर्व एक आले.पण ज्यांना  निवडून दिल त्यांनी तीन वर्षात काय केल फक्त  विकासाच्या घोषणा केल्या  आपण आमदार नसलो तरी रस्ते.वीज.पाणी.  विकास कामासाठी निधी मंत्रालयातुन घेऊन येतोय भ विष्य काळात साईकृपात ईथेनाल प्रकल्प उभा करण्याचा मानस आहे त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार.पण पत्रकार मंडळी  मात्र आमच्या विरोधात लिहितात अजुन  दोन वर्षे काय लिहायच ते लिहा नंतर तुम्हीच माझ चांगलं छापणार असे म्हणत पाचपुतेनी जगताप- नागवडे यांचा समाचार घेतला.
साईकृपा अध्यक्ष सदाशिव पाचपुते म्हणाले सहकारी साखर कारखान्यांना शासनाची मदत मिळते तशी खाजगीला नाही. सहकाराला प्राधान्य द्या खाजगीला ऊस देऊनका सांगून  अपप्रचार करत होते त्यांनी आता खाजगी कारखाना विकत घेतला  जिल्ह्यात सर्वात जास्त  आडवणूक आमची झाली  विकास काही नसताना फक्त टिका करणे उद्योग सुरु के ला.पण त्यांच्या टिकेला उत्तर बाजार भावाने देणार फक्त ऊस चांगला घाला आम्ही प्रसिद्धीत कमी पडतो म्हणून पत्रकार मंडळी वस्तुस्थिती बातमी द्यावी म्हणत आपल्या कार्यक त्यांनी खर पण जोरात बोलल पाहिजे यासाठी आम्हाला ऊस देताना कुठेही वजन करुण वाहन घेऊन यावे ज्यांनी काटा मारला ते मोठे झाले जिल्ह्याच्या बाहेर आपले व्यवसाय सुरु  केले तसे आम्ही मात्र जे आहे ते तालुक्यात सुरु करुण सामान्य माणसाला न्याय देतोय असे पाचपुते म्हणाले.
यावेळी  सभापती भैय्या लगड, लक्ष्मण  नलगे, बाळासाहेब महाडिक, मनोहर पोटे, ज्ञानदेव हिरवे, अरुण हिरडे, कानिफनाथ वाखारे, सुप्रिया पवार, संदिप नागवडे, पोपट  खेतमाळीस, बंडू पंधरकर, शिवाजीराव पाचपुते, विलासराव भोसले. दिलीप चौधरी या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
  कार्यक्रमाला उद्योजक प्रदिप मगर, उंदरे, रोहिदास पवार, भाऊसाहेब कोळपे. बाळासाहेब मांडे, संतोष इथापे. विक्रमसिह पाचपुते जे. डी. अनभुले, यांच्या सह मान्यवर हजर होते.
प्रास्तविक प्रशासकीय अधिकारी हिरामण पाटील यानी केले सुंत्रसंचालन संतोष गुंड यांनी करुण युवा नेते सचिन कातोरे यांनी आभार मानले.