Breaking News

मानोरीचे आरोग्य उपकेंद्र समस्यांच्या विळख्यात

अहमदनगर, दि. 23, ऑक्टोबर - राहुरी तालुक्यातील  मानोरी येथील आरोग्य उपकेंदास अनेक समस्यांनी ग्रासले असुन येथील इमारत ही अंत्यत  धोकादायक  बनली असुन   येथे येणार्या रूग्णांच्या जिवातास धोका निर्माण झाला आहे. प्रशासन या समस्येकडे सोयीस्कर डोळेझाक करत असल्याचा आरोप येथील  ग्रामस्थांनी केला आहे.  
या आरोग्य उपकेंद्रांची  तात्काळ दखल घेऊन  दुरूस्ती करण्याची मागणी येथील नवनिर्वाचित सरपंच आब्बास शेख (दयावान) यांनी केली आहे.
येथील आरोग्य उपकेद्राची इमारत  हि अत्यंत धोकादायक झाली असुन  स्लॅब काही प्रमानात कोसळत आहे.तसेच संरक्षण भिंतीची ठिकठीकाणी दुरवस्था झाली, शोचालयाच्या  खिडक्या मोडकळीस आल्या असुन,चौकटी ही ठिकठीकाणी तुटलेल्या आहेत तसेच डिलेव्हरी रूम ला ही  शौचालयाची उपलब्धता नाही.तसेच या आवारात मोठ्या प्रमाणात  पावसाचे  पाणी साचुन रोगराईस निमंञन मिळत आहे. अशा अनेक समस्यांनी ह्या आरोग्य उपकेंद्रास ग्रासले असुन या आरोग्य उपकेंद्रालाच उपचाराची गरज असल्याचे चिञ निर्माण  झाले  आहे.