Breaking News

केदारेश्‍वर साखर कारखाना रस्ता दुरूस्तीची मागणी

अहमदनगर, दि. 01, ऑक्टोबर - दिवटे-केदारेश्‍वर साखर कारखाना हा दीड किलोमीटर लांबीचा रस्ता दुरूस्त करा,  अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांनी याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हट्ले आहे की, शेवगाव तालुक्यातील दिवटे हे सुमारे दीड-दोन हजार लोकवस्तीचे गाव आहे. हे गाव गोळेगाव लाडजळगावच्या दळणवळणाच्या
दृष्टीने तेसच मुख्य बाजारपेठेला जोडणारा असल्याने महत्त्वाचा आहे.रस्त्याची स्थिती  अत्यंत खराब झाली असून त्यावरील खडी उखडून गेली आहे,याच   रस्त्यावरून जनतेला व शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करणे अडचणीचे ठरून नेहमी लहान मोठे अपघात घडतात, त्यामुळे जीव मुठीत धरून  प्रवास करवा लागत  आहे.या शिवाय या रस्त्यावर अतिक्रमणेही खूप झालेली  आहेत. त्यातून रहदारीला अडथळे येतात. दळणवळणाचा मुख्य रस्ता असल्याने या  रस्त्याचे नव्याने  खडीकरण व डांबरीकरणाचे काम प्रसासनाने हाती घेण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली. हा रस्ता 1972 मध्ये झालेला आहे. त्याची दुरूस्ती व डांबरीकरण तातडीने  न केल्यास  तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा लक्ष्मण कव्हळे, महिफत कणसे,रोहिदास कणसे, नामदेव कणसे, संभाजी जावळे, बाबुराव माळी,  रामराव कणसे, पांडुरंग तहकिक, रघुनाथ वंजारी, सोपान कणसे आदि ग्रामस्थांनी तहसिलदार पाटील  यांनी दिला आहे.