Breaking News

सोसायटीने व्यापारी गाळे निर्माण करावेत- नेमाणे

अहमदनगर, दि. 01, ऑक्टोबर - चापडगाव सेवा संस्थेने उत्पन्न वाढविण्यासाठी स्वतःच्या मालकीची इमारत बांधून त्यात व्यापारी गाळे निर्माण करावेत, जेणे करून संस्थेच्या उत्पनाला हातभार लागेल,असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपत नेमाणे यांनी केले. चापडगाव  विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वार्षिक सभेत ते पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तुकाराम  मडके होते.
यावेळी सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. संस्थेचे सचिव अशोक नलवडे यांनी वार्षिक ताळेबंद सादर केला. त्यालाही सभेने मंजुरी दिली. सभा शांततेत व  खेळीमेळीच्या वातावरण पार पडली. यावेळी अंबादास लहासे, भास्कर गोरे,पंडित नेमाणे आदी उपस्थिती होते.