Breaking News

झिरपे वस्तीला स्वतंत्र वीज रोहित्र मिळावे - जि.प.सदस्या हर्षदा काकडे

अहमदनगर, दि. 01, ऑक्टोबर - तालुक्यातील मंगरूळ बुद्रुक येथील झिरपे वस्ती येथे स्वतंत्र वीज रोहित्र मिळावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी केली आहे.
शेवगाव येथे महावितरणचे अभियंता एस के चिंचाणे यांना सौ. काकडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने शुक्रवार ( दि. 29)  रोजी   या मागणीचे निवेदन  दिले. या निवेदनात म्हटले आहे की मंगरूळ  बुद्रुक  गावठाण व  झिरपे वस्ती या दोन्ही ठिकाणांसाठी एकच विज  रोहित्र आहे.  त्यामुळे, झिरपे वस्ती येथे   अनियमीत वीजपुरवठा होतो. वीज सारखी ये जा करते. वीजेचा दाबही अपुरा असतो. घरातील टिव्ही, फ्रीज, वीजेचे दिवे जळण्याचे प्रकार होऊन ग्रामस्थांना अर्थिक  भुर्दंड व मनस्तापाला सामोरे जाण्याची वेळ येते. झिरपे वस्तीची लोकसंख्या मोठी असून गावठाणच्या रोहित्रापासून वस्तीला वेगळे करावे.  नागरिकांनी वीज जोड  घेण्यासाठी अर्ज करून अनामत रकमा भरल्या आहेत. उर्वरित नागरिकही अनामत रक्कम भरून वीज जोड घेणार आहेत. अनियमीत वीजेची समस्या दूर होण्यासाठी  झिरपे वस्तीसाठी स्वतंत्र रोहित्र मिळावे, असे निवेदनात म्हंटले आहे.
अभियंता चिंचाणे यांनी येत्या तीन चार दिवसांत झिरपे वस्तीला स्वतंत्र वीज रोहित्र देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले.
या वेळी बबन झिरपे, दत्तात्रेय केदार, रेवन्नाथ विघ्ने,  राजू केदार,  लक्ष्मण कदम,  अर्जुन झिरपे,  काशिनाथ विघ्ने, सुधाकर तांदळे,  महादेव तांदळे,  पांडुरंग  वाघ, रावसाहेब विघ्ने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.